नवजात बालिकेला दुधाऐवजी चहा पाजला, चिमुकलीचा अंत

| Updated on: Jul 26, 2019 | 10:20 AM

नजरचुकीने नवजात बालिकेला चहा पाजल्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील फरीदाबादेत घडली. फुप्फुसात संसर्ग झाल्यामुळे तीन दिवसाच्या बालिकेचा मृत्यू ओढवला.

नवजात बालिकेला दुधाऐवजी चहा पाजला, चिमुकलीचा अंत
Follow us on

लखनऊ : नजरचुकीने नवजात बालिकेला चहा पाजल्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील फरीदाबादेत घडली. फुप्फुसात संसर्ग झाल्यामुळे तीन दिवसाच्या बालिकेचा मृत्यू ओढवला. चिमुकलीला संसर्ग झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डॉक्टरांनी बाळाची परिस्थिती पाहून दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं, मात्र कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल न केल्याने तिचा मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या मते, चिमुकलीला कुटुंबीयांनी चहा, पाणी, दह्यासारखे पदार्थ भरवले होते. त्यामुळे तिच्या फुप्फुसात इन्फेक्शन झालं होतं.

सपना नावाच्या महिलेने मुलीला जन्म दिला होता. मात्र सपनाने लगेचच मुलीला चहा, पाणी, दह्यासारखे पदार्थ भरवले. त्यामुळे चिमुकलीच्या फुप्फुसात संसर्ग झाला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिच्यावर 24 तास अतिदक्षता विभागात उपचार झाले, मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.