AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र, जागावाटपाची पहिली यादी समोर, पहा तुमच्या वॉर्डात कोण लढणार?

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असून, वंचित ६२ जागा लढवणार आहे. पहा वॉर्डांची संपूर्ण यादी.

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र, जागावाटपाची पहिली यादी समोर, पहा तुमच्या वॉर्डात कोण लढणार?
vanchit bahujan aghadi
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 3:35 PM
Share

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांनी मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या

नुकतंच वंचित बहुजन आघाडीने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. या अधिकृत पत्रानुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विशेष म्हणजे, या ६२ जागांच्या यादीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यात आता कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ऑनलाईन बैठकीद्वारे मान्यता दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडे देण्यात आलेल्या ६२ जागांमध्ये वॉर्ड क्र. ६, ११, १२, ८४, ९५, १२७, १५३ आणि २२५ यांसारख्या विविध महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

मुंबई महापालिका 62 जागांचे सविस्तर वाटप

विभाग (Zone/Area) वॉर्ड क्रमांक (Ward Numbers)
आर/उत्तर (दहिसर परिसर) 6, 11, 12
पी/उत्तर (मालाड परिसर) 30, 32, 33, 34, 35, 38
के/पश्चिम (अंधेरी प. परिसर) 59, 60, 61, 62
के/पूर्व (अंधेरी पू. परिसर) 80, 82, 83, 84
एच/पश्चिम (वांद्रे प. परिसर) 94, 95, 96, 97
जी/उत्तर (धारावी/माहिम) 184, 185, 188, 189
एल विभाग (कुर्ला परिसर) 151, 152, 153, 154, 155
एम/पूर्व (गोवंडी/मानखुर्द) 123, 124, 125, 126, 127, 128
एन विभाग (घाटकोपर परिसर) 117, 118
दक्षिण मुंबई (कुलाबा/मुंबादेवी) 210, 212, 214, 225, 227
इतर वॉर्ड 24, 65, 72, 100, 102, 105, 131, 134, 138, 143, 168, 169, 199, 202, 205

ही विचारांची आघाडी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीचे स्वागत करताना सांगितले की, काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. १९९९ नंतर राजकीय कारणांमुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते, मात्र तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष मुंबईच्या विकासासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून विचारांची आघाडी असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसकडून वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक

या युतीमुळे दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारे विभाजन या युतीमुळे थांबण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा काँग्रेस-वंचितला होऊ शकतो. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक वापरल्याचे पाहायला मइळत आहे. मात्र या युतीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.