आता पाकवर नेव्हीचा स्ट्राईक? भारतीय पाणबुडी घुसल्याचा पाकचा दावा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली: एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पायलट प्रोजेक्ट झाला रिअल बाकी’ आहे, असा इशारा दिला होता. त्याचीच प्रचिती सीमेवर येत आहे. कारण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता इंडियन नेव्हीनेही अटॅकला सुरुवात केली आहे का असा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानी नौदलाने तसा दावा केला आहे. भारतीय पाणबुडी आपल्या हद्दीत घुसली होती, मात्र आम्ही त्यांना हुसकावून […]

आता पाकवर नेव्हीचा स्ट्राईक? भारतीय पाणबुडी घुसल्याचा पाकचा दावा
Follow us on

नवी दिल्ली: एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पायलट प्रोजेक्ट झाला रिअल बाकी’ आहे, असा इशारा दिला होता. त्याचीच प्रचिती सीमेवर येत आहे. कारण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता इंडियन नेव्हीनेही अटॅकला सुरुवात केली आहे का असा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानी नौदलाने तसा दावा केला आहे. भारतीय पाणबुडी आपल्या हद्दीत घुसली होती, मात्र आम्ही त्यांना हुसकावून लावलं, असं पाकिस्तानी नौदलाने म्हटलं आहे.

2016 नंतर दुसऱ्यांदा भारतीय पाणबुडीने पाकिस्तानी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असा दावा पाकिस्तानी नौदलाच्या प्रवक्त्याने केला.

भारतीय नौदलाचे प्रमुख अडमिरल सुनील लांबा यांनी आजच भारताला समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे असा इशारा दिला होता. त्यांतर लगेचच पाकिस्तानने प्रतिदावा करत, भारताने सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तानी नौदलाच्या प्रवक्त्यांनी एक व्हिडीओ जारी करुन, आम्ही शांती राखण्यासाठी भारतीय पाणबुडीला निशाना बनवलं नसल्याचं म्हटलं. यावरुन आम्हाला शांतता हवी आहे, या घटनेतून भारताने धडा घेऊन शांततेसाठी प्रयत्न करावे, असंही पाकिस्तानने म्हटलं.

पाक नौदलाने जो व्हिडीओ जारी केला आहे, त्यामध्ये पाणबुडीचा वरचा भाग दिसतो, ज्याव्दारे ही पाणबुडी भारतीय असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ 4 फेब्रुवारी रात्री 8.30 च्या सुमारास रेकॉर्ड करण्यात आला आहे.