बीसीसीआयचा एक आदेश आणि इशान किशन टीममधून आऊट, सामना सोडून थेट घरी
इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या या फॉर्मची दखल भारतीय निवड समितीने घेतली आणि त्याची संघात निवड केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याने सर्वाधिक 517 धावा केल्या. तर विजय हजारे ट्रॉफीतही वादळी शतक ठोकलं. पण दुसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर केलं आहे.

इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची दखल निवड समितीला घ्यावी लागली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकपसाठी त्याची संघात निवड केली आहे. त्यानंतर इशान किशन विजय हजारे ट्रॉफीत उतरला होता. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत क्रीडाप्रेमींचं मन जिंकलं होतं. त्याने 34 चेंडूत शतक ठोकलं. पण त्याला पुढच्या सामन्यात संघाने त्याला बाहेर केले. झारखंडचा कर्णधार इशान किशनला राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी आता संघाची धुरा कुमार कुशाग्रच्या खांद्यावर देण्यात आली आहे. इशान किशनने शतकी खेळी करूनही त्याला संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इशान किशनला बीसीसीआयच्या सांगण्यावरून संघातून बाहेर केलं आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर इशान किशनला झारखंडच्या प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं.
विजय हजारे ट्रॉफीत राजस्थानविरुद्धच्या सामन्यात झारखंडचं नेतृत्व करणाऱ्या कुमार कुशाग्रने सांगितलं की, बीसीसीआयने इशान किशनला आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे इशान किशन टीम सोडून घरी परतला आहे आणि 2 जानेवारीला संघासोबत असेल. इशान किशनला तातडीचा आराम दिला गेला आहे. कारण इशान किशनची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप 2026 संघात झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान दुखापत होऊ यासाठी बीसीसीआयने काळजीपोटी त्याला आराम दिला आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकपसाठी फ्रेश राहावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
इशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जेतेपद मिळवलं होतं. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 517 धावा केलया होत्या. यात त्याने जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. यात दोन शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. इतकंच काय तर अंतिम सामन्यात त्याने शतक ठोकल्याने संघाचा विजय पक्का झाला. त्याने 39 चेंडूत 125 धावांची खेळी केली होती. यात 14 षटकार मारले होते. इशान किशनचा फॉर्म टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे बीसीसीआय ताकही फुंकून पित आहे. त्याचा फॉर्म टीम इंडियाल टी20 वर्ल्डकप स्पर्धेत महत्त्वाचा असणार आहे.
