धनंजय मुंडेंच्या समर्थकाच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या झाली आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 24 तासात बीड जिल्हा दोन हत्यांनी हादरला आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. […]

धनंजय मुंडेंच्या समर्थकाच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या झाली आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 24 तासात बीड जिल्हा दोन हत्यांनी हादरला आहे.

अजय भोसले या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. खळबळजनक म्हणजे, पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येशी अजय भोसले हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे दोन्ही हत्यांचे गूढ वाढले आहे.

पांडुरंग गायकवाड हत्या

परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांची ओव्हर ब्रिजच्या खाली धारदार शस्त्राने हत्या झाली. पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पांडुरंग गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे या घटनेला आणखी महत्त्वं आलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात राजकारणाशी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याने, बीडसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाची निर्घृण हत्या

दरम्यान, पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी 6 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हत्येमागे भाजप कार्यकर्त्याचा हात : धनंजय मुंडे

पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येत भाजप कार्यकर्त्याचा हात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  पाणी वाटपावरून पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.