पाकची मजबुरी की नवा डाव? इम्रान खानची 7 विधाने काय दर्शवतात?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

इस्लाबामाद: भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानने भारतीय पायलटला उद्या अर्थात शुक्रवारी सोडणार असल्याची घोषणा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबतची माहिती त्यांच्या संसदेत दिली. यावेळी इम्रान खान यांनी शांततेसाठी सदिच्छा भेट म्हणून पायलटला सोडत असल्याची घोषणा केली. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांनी केलेली विधानं महत्त्वाची आहेत. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान काय म्हणाले? 1) इम्रान खान […]

पाकची मजबुरी की नवा डाव? इम्रान खानची 7 विधाने काय दर्शवतात?
Follow us on

इस्लाबामाद: भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानने भारतीय पायलटला उद्या अर्थात शुक्रवारी सोडणार असल्याची घोषणा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबतची माहिती त्यांच्या संसदेत दिली. यावेळी इम्रान खान यांनी शांततेसाठी सदिच्छा भेट म्हणून पायलटला सोडत असल्याची घोषणा केली. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांनी केलेली विधानं महत्त्वाची आहेत.

पाकिस्तानी संसदेत इम्रान खान काय म्हणाले?

1) इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संयुक्त संसदेला आज निवेदन दिलं. यावेळी त्यांनी भारतीय पायलटची सुटका उद्याच करु असं सांगितलं. मात्र भारतीय पायलटची सुटका म्हणजे आमचा दुबळेपणा समजू नये, असं इम्रान खान म्हणाले.

2) सर्व समस्या या संवादातूनच सोडवायला हव्या.  करतारपूर कॉरीडोअर आम्ही सुरु करुनही भारताने प्रतिसाद दिला नाही.

3) जेव्हा पुलवामा हल्ला घडला, त्याच्या अवघ्या 30 मिनिटातच आमच्यावर आरोप करण्यात आला. मला हे म्हणायचं नाही की भारतानेच त्याबाबतची खेळी केली असेल, पण मी त्यांना पुरावे देण्याची मागणी केली, असं इम्रान खान म्हणाले.

4) भारतीय मीडियाने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. मात्र आमच्या माध्यमांनी एकी दाखवत जबाबदारीने वार्तांकन केलं, असंही इम्रान खान म्हणाले.

5) आम्हाला जाणीव होती की ते (भारतीय) काहीतरी करतील, भारताने आमच्यावर हल्ला करुन दोन दिवसांनी म्हणजेच आज डोजियार (पुरावे) दिले.

6) भारताने जर काही कारवाई केली, तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ, असं मी त्यांना बजावलं होतं. भारताने संयुक्त राष्ट्राच्या नियमांची पायमल्ली केली, असं इम्रान खान म्हणाले.

7) आम्ही निर्णय घेतला आहे की पकडलेल्या भारतीय पायलटला उद्या शांततेसाठी सदिच्छा भेट म्हणून सोडणार आहोत.

इम्रान खानने ही वक्तव्य करुन पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. मात्र पाकिस्तानवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव होता, हे यावरुन दिसून येतं. शिवाय युद्धकैद्यांबाबतचा जेनिव्हा करार महत्त्वाचा ठरल्याने भारतीय पायलट अभिनंदन यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होणार आहे.