धक्कादायक! अज्ञात व्यक्तीने बस स्थानकाला लावली आग; परिसरातल्या हातगाड्या, सायकलीसुद्धा आगीत फेकल्या

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून कसून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धक्कादायक! अज्ञात व्यक्तीने बस स्थानकाला लावली आग; परिसरातल्या हातगाड्या, सायकलीसुद्धा आगीत फेकल्या
| Edited By: | Updated on: Nov 04, 2020 | 7:15 PM

अकोला : अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातील आलेगांव इथं बस स्थानकाला अज्ञात व्यक्तीने आग लावून बस स्थानकासमोरील लाकडी हातगाड्या, सायकली, लाकडीलोखंडी बाकळे आदी वस्तुंना एकत्रित करून जाळण्याचा प्रकार रात्रीच्या दरम्यान घडल्याने गावामध्ये एकच खडबड उडाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून कसून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (person set fire to akola bus stand and even handcarts bicycles through in fire )

चांनी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या आलेगांव जुने बसस्थानका समोर विविध शेकडो धंदेवाईक आपआपली दुकाने थाटून आहेत. यामध्ये होलसेल दोन किराणा दुकानं असून इतर किरकोळ दुकानं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने बस स्थानकामध्ये कचरा टाकून शेकोटी केली आणि त्यानंतर बस स्थानक परिसरातील इतर दुकानांसमोरील दोन हातगाड्या, दोन सायकली, लाकडी, लोखंडी बाकळे घेऊन आगीत टाकली.

इतकंच नाही तर बस स्थानकाबाजूलाच असलेल्या प्लास्टिक ताडपत्र्या, बारदाना विक्री दुकाना समोरील प्लास्टिक दोन रोल, दोन बारदाना गठ्ठा अशा सर्व वस्तुंना एकत्र करून पेटवून दिलं. यामुळे परिसरात मोठी आग लागली आणि मोठ्या प्रमाणात वस्तूंचं नुकसान झालं. पण सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रात्रीच्या दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने हा धक्कादायक प्रकार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 60 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या जमादार इंगळे आणि कर्मचारी दादाराव आढाव यांनासोबत घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. अन्यथा मोठा अनर्थ होऊन आग आटोक्यात आणणं कठीण झालं असतं. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं असतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

झालेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी विकृत घटना करणाऱ्या विरोधात तपास घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

इतर बातम्या – 

महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून कौतुक

बाजूने बोललं तर ठिक, अन्यथा घरात घुसून खेचणार का? महाजनांचा सवाल

(person set fire to akola bus stand and even handcarts bicycles through in fire )