इंदापुरात 3500 फुटांवरुन विमान कोसळलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापुरात विमान कोसळून दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाडानंतर हे विमान तब्बल साडेतीन हजार फुटांवरुन खाली कोसळलं. या अपघातात शिकाऊ पायलट जखमी झाला आहे. इंदापूर तालुक्यातील रूई येथील श्री बाबीर विद्यालयाजवळ दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. शिकाऊ पायलट सिध्दार्थ टायटस हे बारामतीवरुन विमान घेऊन निघाले होते. त्यावेळी इंदापूरजवळ विमान इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड […]

इंदापुरात 3500 फुटांवरुन विमान कोसळलं
Follow us on

पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापुरात विमान कोसळून दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाडानंतर हे विमान तब्बल साडेतीन हजार फुटांवरुन खाली कोसळलं. या अपघातात शिकाऊ पायलट जखमी झाला आहे. इंदापूर तालुक्यातील रूई येथील श्री बाबीर विद्यालयाजवळ दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली.

शिकाऊ पायलट सिध्दार्थ टायटस हे बारामतीवरुन विमान घेऊन निघाले होते. त्यावेळी इंदापूरजवळ विमान इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान 3500 फूट उंचीवरुन खाली कोसळलं. या दुर्घटनेमुळे पायलट सिध्दार्थ टायटस जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुई येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन, पुढील उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलं.