अधिकाऱ्याने मोफत आयपीएल पास मागितला, मोदींनी धडा शिकवला

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यकाळात कपात केली आहे. अधिकारी गोपाल कृष्ण गुप्ता यांच्यावर दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून आयपीएल सामन्यांसाठी मोफत पास मागितल्याचा आरोप आहे. याशिवाय गुप्ता यांना त्यांचं मूळ केडर रेल्वे मंत्रालयात पाठवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कॅबिनेट नियुक्ती समितीने (एसीसी) गुप्ता यांच्या मूळ केडरमध्ये परतण्यास मान्यता दिल्याचं कामगार […]

अधिकाऱ्याने मोफत आयपीएल पास मागितला, मोदींनी धडा शिकवला
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यकाळात कपात केली आहे. अधिकारी गोपाल कृष्ण गुप्ता यांच्यावर दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून आयपीएल सामन्यांसाठी मोफत पास मागितल्याचा आरोप आहे. याशिवाय गुप्ता यांना त्यांचं मूळ केडर रेल्वे मंत्रालयात पाठवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कॅबिनेट नियुक्ती समितीने (एसीसी) गुप्ता यांच्या मूळ केडरमध्ये परतण्यास मान्यता दिल्याचं कामगार मंत्रालयाने सांगितलं. पण आदेशामध्ये त्यांच्या पुनरागमनाचं कारण सांगितलेलं नाही.

गोपाल कृष्ण गुप्ता हे भारतीय रेल्वे मेकॅनिकल इंजिनीअर्स ब्रांच 1987 चे अधिकार आहेत. ते सध्या  Ministry of New and Renewable Energy मध्ये संयुक्त सचिव पदावर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्ता यांनी दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांच्या कार्यालयातून आयपीएल सामन्यासाठी पास मागितले होते. डीडीसीएकडून उत्तर न आल्यानंतर गुप्ता यांनी शर्मा यांना पत्र लिहिलं आणि तपशील दिला होता.

या तपशीलामध्ये शर्मा यांची सहाय्यक सपना सोनी आणि स्वतःची खाजगी कर्मचारी यांच्यात संभाषण झाल्याचाही उल्लेख होता. “तुमचा कर्मचारी अशा प्रकरणांमध्ये शिष्टाचार दाखवून वेळेवर माहिती देईल याची मी अपेक्षा करु शकतो का? उत्तर सकारात्मक नसलं तरीही चालेल. माझ्या मते आपण आपल्या पदांविषयी पारस्परिक सन्मान ठेवायला हवा,” असं या पत्रामध्ये लिहिलं होतं. सोशल मीडियामध्ये हे पत्र व्हायरल झाल्यानंतर गुप्ता यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.