कोरोना विषाणू संदर्भात एप्रिल फूल मेसेज व्हायरल केल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार

दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात (Police action on April fool message) आलं आहे.

कोरोना विषाणू संदर्भात एप्रिल फूल मेसेज व्हायरल केल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार
| Edited By: | Updated on: Mar 31, 2020 | 8:40 AM

पुणे : दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात (Police action on April fool message) आलं आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक कोरोना विषाणू संबंधित खोटी माहिती पसरवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. “जर कुणी कोरोना विषाणू संबंधित एप्रिल फूल केले तर मेसेज करणाऱ्यावर आणि अॅडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहे”, असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी (Police action on April fool message) दिला आहे.

“देशावर कोरोना विषाणूचे मोठे संकट आलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे 1 एप्रिलला कोरोना विषाणू यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण करतील असे मेसेज टाकू नये, सोशल मीडियावर व्हायरल करू नये”, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

“नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नसल्याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात ग्रुप ॲडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल अशी सेटिंग करावी”, असं आवाहनही शिसवे यांनी केलं.

“कोरोना विषाणू संदर्भात व्हॉट्स्अॅपवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या जात आहेत. असे मेसेज पाठवणाऱ्यांना अटक आणि दंडाची शिक्षा असल्याचे शिसवे म्हणाले.”

दरम्यान, 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणिला खोटे मेसेज पाठवणूक फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यंदा एप्रिल फूलमध्ये कोरोना विषाणूं संबंधित चुकीचे मेसेज सेंड केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.