वडिलांनी फी थकवली म्हणून मुलाला तीन तास शाळेत बसवून ठेवलं

लातूर : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना लातुरात घडली आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून दुसरीतल्या चिमुकल्याला मुख्याध्यापिकेने तीन तास कार्यालयात बसवून ठेवले. ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली. लिटील ऐंजल असं या शाळेचं नाव आहे. हा प्रकार करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापिका आणि संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर शहरातल्या लिटील ऐंजल शाळेत सात वर्षांचा […]

वडिलांनी फी थकवली म्हणून मुलाला तीन तास शाळेत बसवून ठेवलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

लातूर : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना लातुरात घडली आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून दुसरीतल्या चिमुकल्याला मुख्याध्यापिकेने तीन तास कार्यालयात बसवून ठेवले. ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली. लिटील ऐंजल असं या शाळेचं नाव आहे. हा प्रकार करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापिका आणि संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहरातल्या लिटील ऐंजल शाळेत सात वर्षांचा चंद्रशेखर स्वामी दुसऱ्या वर्गात शिकतो. त्याच्या वडिलांकडे शाळेची 18 हजार रुपये फी बाकी आहे. आपली आर्थिक अडचण दूर झाली की आपण लगेच पैसे भरु असे चंद्रशेखरचे वडील कार्तिक स्वामी यांनी शाळा प्रशासनाला सांगितले होते. मात्र शाळा प्रशासन फी  भरुन घेण्यासाठी आग्रही होते.

शनिवारी चंद्रशेखर हा नेहमी प्रमाणे स्कूल व्हॅनने शाळेत गेला. शाळा सुटून तीन तास झाले तरी तो परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वडील कार्तिक स्वामी हे शाळेत पोहोचले. त्यांना तिथे चंद्रशेखर हा मुख्याध्यापिकेच्या खोलीत बसलेला दिसला. याबद्दल स्वामी यांनी विचारणा केली असता, तुम्ही फी आणली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. वेळोवेळी सांगूनही तुम्ही फी घेऊन येत नाही, म्हणून आम्हाला मुलाला शाळेतच बसवून ठेवावे लागले, असे मुख्याध्यापिकेने सांगितले.

त्यानंतर कार्तिक स्वामी यांनी पोलीस ठाणे गाठत शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा ममदापुरे, संस्थाचालक राजकुमार ममदापुरे आणि शिक्षक सरफराज शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला.

फी  वसुलीसाठी शाळा कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, याचा प्रत्यय या घटनेने आला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.