पुण्यात विहिरीतील गाठोड्यात सापडलेल्या सांगाड्याचा 48 तासात छडा

| Updated on: Jun 22, 2019 | 1:19 PM

केसनंदमध्ये विहरीत सापडलेल्या सांगाड्याचा अवघ्या 48 तासत छडा लावण्यत लोणीकंद पोलिसांना यश आलं आहे.

पुण्यात विहिरीतील गाठोड्यात सापडलेल्या सांगाड्याचा 48 तासात छडा
Follow us on

पुणे : केसनंदमध्ये विहरीत सापडलेल्या सांगाड्याचा अवघ्या 48 तासत छडा लावण्यत लोणीकंद पोलिसांना यश आलं आहे. पतीनेच पत्नीच्या आजारपणाला कंटाळून खून केल्याचं उघड झालं आहे. दोन दिवसापूर्वी केसनंद परिसरात गाठोड्यात हाडांचा सांगाडा सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण लोणीकंद पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपीला अटक करुन, या घटनेचं गूढ उलगडलं.

शिलाबाई राजू सुतार (स्वामी) असे सांगाडा सापडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खून करणारा पती राजू सातप्पा सुतार याला पोलिसांनी सोलापूर येथून 48 तासात अटक केली.

एका गाठोड्यात पत्नीचे हातपाय बांधून ते गाठोडं जवळच्या विहिरीत दगड बांधून फेकून दिलं होतं. राजू सुतारने पत्नी शिलाबाईच्या आजारपणाला कंटाळून खून केला होता.

केसनंद गावच्या हद्दीत राजेंद्र जाधव यांच्या शेतजमीनीत असलेल्या विहिरीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील हाडांचा सांगाडा मंगळवारी आढळला होता. या सांगाड्यासोबत कपडे आणि दागिने आढळले होते. त्यावरुन पोलिसांनी तपास केला.  पोलिसांच्या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी सुतार काम करणारे राजू सुतार पत्नीसह केसनंद-तळेरानवाडी येथील बाळासाहेब वाळके यांच्या खोलीत राहत होते. त्यावेळी सुतार यांची सतत आजारी असणारी पत्नी अचानक गायब झाली होती, तर एक आठवड्यानंतर राजू सुतार देखील सर्व सामान घरात सोडून गावी पसार झाले होते.

पोलिसांची शंका बळावल्याने सुतार यांच्या गावाचा शोध घेत पोलीस सोलापुरात पोहोचले. दक्षिण सोलापूरमधील कुंभारी गावात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पत्नी शिलाबाई दोन वर्षापासून कॅन्सरे पीडित होती. तिच्यावर उपचार करणे शक्य होत नसल्याने, आजारपणाच्या खर्चाला कंटाळून तिला गाठोड्यात दोरीने बांधून त्याला दगड बांधून जवळच असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून हत्या केल्याची कबुली राजू सुतारने पोलिसांना दिली.

VIDEO :