माणुसकीही हरली, पुण्यावरुन आलेल्या दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारला, माळरानावर झोपडीत राहण्याची वेळ

| Updated on: May 21, 2020 | 1:19 PM

नांदेड जिल्ह्यातील एक जोडपे कामानिमित्त पुण्याला गेले होते. लॉकडाऊनमुळे हे जोडपं आपल्या गावी परतलं. (Pune returns couple denied entry in Nanded village)

माणुसकीही हरली, पुण्यावरुन आलेल्या दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारला, माळरानावर झोपडीत राहण्याची वेळ
Follow us on

नांदेड : कोरोनाच्या दहशतीने माणुसकीला तिलांजली दिली का? असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना नांदेडमध्ये उघड झाली आहे. (Pune returns couple denied entry in Nanded village) कारण लॉकडाऊन काळात ज्या तरुणाने पुण्यात सेवाभावी संस्थेच्या अन्नधान्य वाटपासाठी 45 दिवस काम केले होते, त्याच तरुणावर आता निर्जनस्थळी दिवस काढायची वेळ आली आहे. (Pune returns couple denied entry in Nanded village)

नांदेड जिल्ह्यातील एक जोडपे कामानिमित्त पुण्याला गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे पुण्यात काम राहिले नाही, त्यामुळे हे जोडपं आपल्या गावी परतलं. बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव या मूळ गावी आल्यावर या जोडप्याला गावकऱ्यांनी गावात प्रवेशही करु दिला नाही. इतक्या लांबून आलेल्या या जोडप्यावर दया माया दाखवण्याऐवजी गावकऱ्यांनी या जोडप्याला गावातून अक्षरश: हाकलून लावलं. त्यामुळे आता हे जोडपे दूर कंधारच्या एका माळरानात पाल-झोपडी टाकून राहत आहे.

या सगळ्या घटनेमुळे कोरोनाची किती अनाठायी भीती समाजात पसरली याचा अंदाज येत आहे. या जोडप्याला सुरक्षित ठिकाणी आसरा द्यावा अशी मागणी काही जागरुक नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे या घटनेची अद्याप प्रशासनाने साधी दखलही घेतलेली नाही.

नांदेडमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण
नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नांदेडमधील रुग्णसंख्या 110 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 36 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर कोरनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 39 हजारांवर

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवागणिक वाढत चालला आहे (Maharashtra Corona Update). राज्यात काल (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे. राज्यात आज 697 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 10 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 26 हजार 581 रुग्णांवर उपाचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

(Pune returns couple denied entry in Nanded village)

संबंधित बातम्या 

राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 2250 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 39 हजार पार