Pune Salon | एकदाच वापरले जाणारे टॉवेल-नॅपकिन्स, पुणे विभागातील सलून सुरु करण्याची तयारी

| Updated on: Jun 27, 2020 | 11:20 AM

केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी-शर्तींच्या अधीन परवानगी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. (Pune salon and barber shop)

Pune Salon | एकदाच वापरले जाणारे टॉवेल-नॅपकिन्स, पुणे विभागातील सलून सुरु करण्याची तयारी
Follow us on

पुणे : राज्य सरकारने उद्या म्हणजे रविवार 28 जूनपासून सलून सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. पुणे प्रशासनाकडूनही पुणे परिसरात ही दुकाने सुरु करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विशिष्ट अटी शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी आणि शर्तींच्या अधीन परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं. (Pune salon and barber shop)

पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रात, नगरपंचायत, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, तसेच छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर चालू ठेवता येणार आहेत. 28 जून पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी राम यांनी दिली परवानगी.

राज्य सरकारचे नियम काय?

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलून, आणि ब्युटी पार्लस 28 तारखेपासून सुरु करता येतील. मात्र या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील आणि त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. केवळ केस कापता येतील, दाढी करता येणार नाही.

या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

  • केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
  • दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
  • ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर 2 तासांनी सॅनिटाईज करणे गरजेचे आहे.
  • फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.
  • उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.

VIDEO : Salon Shops | राज्यात सलून दुकाने सुरु होणार, दाढीला मात्र अद्याप परवानगी नाही : अनिल परब

पुणे विभागात उद्योगधंद्यांना गती

लॉकाडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर कच्चा माल, मनुष्यबळ आदी आव्हाने पार करुन उद्योगांची चाके आता गतिमान होत आहेत. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील सुमारे 40 ते 60 टक्के उद्योग सुरु झाले आहेत. पुणे विभागातही महापालिका क्षेत्र वगळता सुरू झालेल्या उद्योगांचे प्रमाण सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले.

तर, पुणे शहरातील उद्योग क्षमतेच्या सुमारे 40 टक्के उद्योग सुरु झाले आहेत. अन्नधान्य वितरण, औषध निर्माण, फाऊंड्री, हातमाग, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी तसेच उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्रातील कामाला सुरुवात झाली आहे. परराज्यांतील कामगारही काही प्रमाणात परतण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी याबाबत माहिती दिली.

संबंधित बातम्या 

Salon and Gym | सलून सुरु करण्यास परवानगी, केवळ केस कापता येणार, दाढी नाही!