पुण्यात अनोखा विक्रम…. 3 मिनिटात 543 लोकसभा मतदारसंघ बोलून दाखवले!

पिंपरी चिंचवड : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकूण सात टप्प्यांपैकी सहा टप्प्यातील मतदानही पार पडले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस उरले असताना, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे लोकसभा निवडणुकीशी संबंधितच एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेनेही घेतली आहे. राजेश शिरोडकर असे विक्रम करणाऱ्या व्यक्तीचे […]

पुण्यात अनोखा विक्रम.... 3 मिनिटात 543 लोकसभा मतदारसंघ बोलून दाखवले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

पिंपरी चिंचवड : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकूण सात टप्प्यांपैकी सहा टप्प्यातील मतदानही पार पडले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस उरले असताना, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे लोकसभा निवडणुकीशी संबंधितच एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेनेही घेतली आहे. राजेश शिरोडकर असे विक्रम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

राजेश शिरोडकर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. तीन मिनेटे आणि काही सेकंदात देशातील एकूण 543 लोकसभा मतदारसंघांची नावं भराभर बोलून दाखवली. अर्थात, ही नावं कुठेही न पाहता बोलून दाखवली, म्हणजेच 543 लोकसभा मतदारसंघात राजेश शिरोडकरांच्या अगदी तोंडपाठ होती.

राजेश शिरोडकर हे पेशाने शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या या विक्रमाची पिंपरी-चिंचवडसह सर्वत्र चर्चा होत आहे.

विशेष म्हणजे, राजेश शिरोडकर यांच्या मुलाच्या नावावरही विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यांच्या 10 वर्षी मुलाच्या नावावर दोन विक्रमांची नोंद आहे. प्रीत असे त्यांच्या मुलाचे नाव असून, त्याने 96 सेकंदात 193 देशांची नावं भराभर बोलून दाखवली होती.

पिंपरी चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 9 मिनिटं वेळ दिला गेला, मात्र अवघ्या 3 मिनिट आणि काही सेकंदात 543 मतदार संघ शिरोडकरांनी बोलून दाखवले.

पिंपरी-चिंचवडमधील या बाप-बेट्यावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवाय, त्यांच्या या अनोख्या विक्रमाचेही कौतुक केले जात आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.