सर्वात मोठी बातमी, अजित पवार गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल मोठा दावा

"अजित पवार यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे. 2 जुलै 2023 च्या शपथीविधी विषयी बोलायला हवं. राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार, लोकसभेला किती जागा मिळणार याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्या होत्या", असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला.

सर्वात मोठी बातमी, अजित पवार गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल मोठा दावा
आमदार सुनीळ शेळके आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 8:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा पडद्यामागे नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या होत्या, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनील शेळके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला, तुम्ही पुढे जा… माझा राजीनामा देतो. त्यानंतर शरद पवार यांना राजीनामा मागे का घ्यावा लागला? हे केवळ सुप्रिया सुळे सांगू शकतात. पवार कुटुंब टिकावं म्हणून आजही अजित पवार गप्प आहेत. याचा फायदा खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड घेत आहेत”, असं सुनील शेळके म्हणाले.

“शरद पवार काही बोलले तरी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या बोलण्याचं आम्हाला वाईट वाटत नाही. रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना बोलण्यास भाग पाडतात. शरद पवारांच्या मनात आमच्याबद्दल विष पेरण्याचं काम केलं आहे”, असा मोठा दावा सुनीळ शेळके यांनी केला.

“2 जुलै 2023 ला सकाळी देवगिरीवर गेलो आणि दुपारी शपथविधी झाला. यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. हे अवघ्या काही तासात झाले नाही, यामागे दोन महिन्यांचा प्लॅन होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा होता तो घेतला. या घडामोडींच्या सुप्रिया सुळे यादेखील साक्षीदार होत्या”, असं सुनील शेळके म्हणाले.

‘राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार याबाबत शरद पवारांसोबत चर्चा’

“अजित पवारांना विनाकारण व्हिलन केलं जातंय. साहेबांची अजित पवारांनी साथ सोडली याचा माहोल केला जातोय. अजित पवार यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे. 2 जुलै 2023 च्या शपथीविधी विषयी बोलायला हवं. राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार, लोकसभेला किती जागा मिळणार याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्या होत्या”, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला.

‘यामागे त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ’

“शरद पवार यांनी राजीनामा दिला तो मागे घेण्यासाठी काही जणांनी भाग पाडले. अजित पवारांना रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे लक्ष्य करत आहेत. यामागे त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला, तुम्ही पुढे जा… माझा राजीनामा देतो. त्यानंतर शरद पवार यांना राजीनामा मागे का घ्यावा लागला? हे केवळ सुप्रिया सुळे सांगू शकतात. शरद पवार यांना पुढे करून ही निवडणूक लढत आहेत”, असं सुनील शेळके म्हणाले.

“अजित पवारांनी बंडखोरी केली, अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. हे जे काही दाखवत आहेत यावर पवार कुटुंब टिकावं म्हणून अजित पवार गप्प आहेत. वडिलांचं नात जोडून सुप्रिया सुळे भावनिक आवाहन करत आहेत. अजित पवारांना विरोध करणाऱ्यात सुनील शेळकेही होते, पण ते आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना पाहतो आहोत”, असा दावा सुनील शेळके यांनी केला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.