AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंग धमकी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, मुंबई पोलीस म्हणाले…

अभिनेता रणवीर सिंग याला कोणी पाठवली धमकी? धक्कादायक माहिती अखेर समोर... मुंबई पोलिसांनी गोळा केलेत तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे... सतत येत असलेल्या धमक्यांमुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण...

रणवीर सिंग धमकी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, मुंबई पोलीस म्हणाले...
अभिनेता रणवीर सिंग
| Updated on: Feb 13, 2026 | 8:55 AM
Share

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला लक्ष्य करणाऱ्या कथित धमकी आणि खंडणीच्या प्रयत्नात एक महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख पंटर हॅरी बॉक्सर याला या धमकीच्या संदेशामागील मुख्य संशयित म्हणून ओळखले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की अभिनेत्याच्या मॅनेजरला 1 कोटी रुपयांची खंडणी मागणी करणारी व्हॉट्सअप व्हॉइस नोट पाठवण्यात आली होती. प्राथमिक विश्लेषणादरम्यान, क्राइम ब्रांचने मेसेजमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचा समोर आलंय.

मात्र अधिकाऱ्यांचा म्हणणं आहे की निष्कर्षांला पुष्टी देण्यासाठी अधिक तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. चित्रपट निर्माते रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच ही धमकी मिळाल्याची माहिती आहे.

व्हॉइस नोटमध्ये धमकी आणि खंडणीची मागणी असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून रणवीर सिंगभोवतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या मॅनेजरचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर तपास अधिक तीव्र केला आहे.

सूत्रांच्या माहिती प्रमाणे , हा संदेश व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) द्वारे पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये डिजिटल ट्रेल परदेशातील स्थान दर्शवत होता. नेटवर्कचे मूळ शोधण्यासाठी आणि धमकी कोणत्या देशातून प्रसारित केली गेली हे ओळखण्यासाठी, गुन्हे शाखेने इंटरपोलची मदत घेतली आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रोहित शर्मा, रणवीर सिंग यांच्यानंतर अभिनेता आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आली… मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासात असे दिसून आले की गोळीबारात वापरलेली गाडी पुण्याहून आणली होती. ती गाडी पुण्यातील एका रहिवाशाची होती ज्याने काही दिवसांपूर्वी अटक केलेला आरोपी आदित्य गायकीला ती गाडी 30 हजार रुपयांना विकली होती.

रोहित शर्मा, रणवीर सिंग यांच्यानंतर अभिनेता आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आली… मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासात असे दिसून आले की गोळीबारात वापरलेली गाडी पुण्याहून आणली होती. ती गाडी पुण्यातील एका रहिवाशाची होती ज्याने काही दिवसांपूर्वी अटक केलेला आरोपी आदित्य गायकीला ती गाडी 30 हजार रुपयांना विकली होती.

नंतर, आदित्य गायकी आणि दुसरा आरोपी समर्थ पोमाजी यांनी मुंबईतील जुहू परिसरातील ठरलेल्या ठिकाणी गाडी उभी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी खरदे करुन मुंबईत पोहोचलेल्या लोकांना माहिती होतं की, शूटर कोण आहे. त्यानंतर शुभम लोंकार याने शूटर याला गाडी उचलण्याची आणि फायरिंग करण्याचे आदेश दिले.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?