AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : येत्या काही तासांत वातावरणात मोठा बदल, या जिल्ह्यात पावसाचं संकट..

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा अनुभवायाला मिळत आहेत , त्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update : येत्या काही तासांत वातावरणात मोठा बदल, या जिल्ह्यात पावसाचं संकट..
महाराष्ट्र हवामान
| Updated on: Feb 13, 2026 | 8:26 AM
Share

फेब्रुवारी महिना सुरू झाला नाही तोच उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. आत्ताच ही स्थिती तर ऐन उन्हाळ्यात काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. सकाळी थोडा गारवा असला तरी सूर्य डोक्यावर आल्यावर तापमानाचा पारा चांगलाच चढतो. मात्र फेब्रुवारीचे 12- 13 दिवस कोरडे गेल्यावर आता राज्याच्या वातावरणात वेगान बदल दिसून येत आहेत. उत्तर भारतात सतत येणाऱ्या वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे देशाचं हवामान जलद बदलत असून त्याचेच परिणाम महाराष्ट्रातही उमटताना दिसू शकतात. राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण असलं तरी येत्या काही तासांत राज्यात पावसाचे आगमन होऊ शकते. येत्या 17-18 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील काही जिव्हात पाऊस कोसळू शकतो, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

राज्यात कुठे पडणार पाऊस ?

हवामाना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचाच परिणा येत्या काही दिवसांंत दिसून येऊ शकतो आणि 17-18 तारखेला पावसाच्या सरी कोसळू शकतात. महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. मोठा, मुसळधार पाऊस पडणार नसला तरी ऐन फेब्रुवारीत पर्जन्य आल्यास त्याचा पिकांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तसेच वाढत्या तापमानावरही त्याचा असर पडू शकतो.

दरम्यान उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे थड असून गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेलस गारव्यातही वाढ झाल्याची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात पारा काहीसा घसरलेला दिसला. आखणी काही दिवस हीच स्थिती कायम राहू शकते.

नाशिकमध्ये तापमान 32 अंशांपार

गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान 32 अंशांपार गेलं आहे. शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. वातावरणात जाणवणारी थंडी, गारवा गायब झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागण्यात सुरुवात आहे. उष्यामध्ये वाढ झाली असून रात्रीही काही प्रमाणात उकाडा जाणवतोय. कमाल व किमान तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना रात्री जाणवणारा गारठासुद्धा आता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना