AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एनडीएसोबत की मविआसोबत? अखेर शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! एनडीएसोबत की मविआसोबत? अखेर शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
SHARAD PAWARImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 17, 2026 | 9:37 AM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आठही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर या खासदारांची शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, परंतु आता अखेर शरद पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण विरोधातच आहोत, जोमाने काम करा असा स्पष्ट संदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे. आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये, जोमाने काम करा असं बैठकीमध्ये शरद पवार यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीमधील संभ्रम देखील दूर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महत्त्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 दिवसीय बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याकडून महत्त्वाची बाब अधोरेखीत करण्यात आली आहे.  राज्याच्या विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांकडून पक्ष एनडीए सोबत जाणार आहे का? याबाबत सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना सुप्रिया सुळें यांनी  नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनातील आपल्या सरकार विरोधी भाषणांकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आपण सभागृहात ज्या प्रकारे लढत आहोत, त्याच प्रमाणे रस्त्यावरची देखील लढाई लढायची आहे. सध्या जिल्ह्यात जी रिक्त पदे आहेत ती तातडीने भरा आणि कामाला लागा,  लवकरच आपण देखील महाराष्ट्र दौरा करणार असून, लोकांच्या प्रश्नांवर ताकदीने लढा असे निर्देश यावेळी सुप्रिया सुळे यांनी जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.  शनिवार, आणि रविवारी पार पडलेल्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्याकडून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे. आता फक्त  कोकणातील जिल्हांचा आढावा बाकी आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...