अपयश येताच वडिलांपासून दूर झाले होते राजीव कपूर, वाचा या मागचं कारण

| Updated on: Feb 09, 2021 | 3:33 PM

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील हिट अभिनयामुळे ओळखले प्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे आज निधन झाले.

अपयश येताच वडिलांपासून दूर झाले होते राजीव कपूर, वाचा या मागचं कारण
राजीव कपूर
Follow us on

मुंबई : ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील हिट अभिनयामुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे आज निधन झाले. 58 वर्षीय राजीव यांना हृदयविकाराच्या झटक्या आल्याने निधन झाले. प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना इनलिंक्स रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे करिनाचे वडील रणधीर कपूरही आहेत. रणधीरने या वृत्ताला दुजोरा दिला आणि म्हणाले की, ‘मी माझा आज छोटा भाऊ गमावला आहे, राजीव आता या जगात नाही. (Rajiv Kapoor Death of heart attack)

डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण तो त्यांना वाचवू शकला नाही. रणधीर यांनी असेही म्हटले आहे की, ते आता आपल्या भावाच्या मृतदेहाची वाट पाहत आहे. राजीव कपूर हे राज कपूर यांचा लहान मुलगा होते. चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे ते चर्चेत राहिले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत फक्त एक सुपरहिट चित्रपट केला. याशिवाय त्यांचे बहुतेक चित्रपट फ्लॉप गेले.

अशा परिस्थितीत राजीव प्रयत्न करूनही कधीच चर्चेत येऊ शकले नाहीत. राजीव कपूर यांचे बरेच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राज कपूरने राजीव कपूरला आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आणि राजीव यांचा ‘राम तेरी गंगा मैली हो गया’ चित्रपट हिट झाला. त्यानंतरही वडील राज कपूर यांना दुसर्‍या चित्रपटात घेण्यासाठी तगादा लावला मात्र, परत दुसऱ्या चित्रपटात घेण्यास राज कपूर यांनी नकार दिला. आणि त्यानंतरच राजीव कपूर वडिलांपासून दूर गेले होते. गेल्या वर्षीच ऋषि कपूर यांचे निधन झाले होते, त्याच दु:खातून कपूर कुटुबिंय बाहेर आले नव्हते आणि आता त्यामध्येच राजीव कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

Rajiv Kapoor | कपूर कुटुंबावर पुन्हा शोककळा, राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नसीरुद्दीन शहांचं असं काही ट्वीट की नेटकरी भडकले, पण पत्नी रत्ना पाठकनं केला धक्कादायक खुलासा !

(Rajiv Kapoor Death of heart attack)