भाजपला मोठा धक्का, खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Rajya Sabha MP Sanjay Kakade) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

भाजपला मोठा धक्का, खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 5:05 PM

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Rajya Sabha MP Sanjay Kakade) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या जळगाव येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला निमंत्रण दिल्याचं संजय काकडे यांनी  सांगितलं आहे. त्यामुळे संजय काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, जर संजय काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपचं मोठं नुकसान होईल.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी काकडेंची अपेक्षा आहे. मात्र, काकडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार आहे (Rajya Sabha MP Sanjay Kakade). उदयनराजे यांच्या उमेदवारीवर संजय काकडे यांनी गेल्या आठवड्यात आक्षेप घेतला होता. उदयनराजे यांचं भाजपसाठी काय योगदान आहे? असा सवाल करत काकडे यांनी टीका केली होती. मात्र, भाजप उदयनराजे यांच्या उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काकडे नाराज आहेत.

दरम्यान, संजय काकडे यांनी याअगोदर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपला अडचणीत आणलं आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्नी संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची मनधरणी करण्यात यश आलं होतं. त्यामुळे काकडे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा तशीच चर्चा सुरु झाली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.