रणवीर सिंह उपस्थित राहण्याबद्दल कोणतेही विनंती पत्र मिळाले नाही, एनसीबीचा दावा

| Updated on: Sep 25, 2020 | 4:48 PM

दीपिकाला डिप्रेशनचा त्रास असल्याने या चौकशी दरम्यान दीपिकाच्यासोबत राहता यावे म्हणून रणवीर सिंहने एनसीबीला विनंती केली आहे. (Ranveer Singh wrote letter to NCB to let him join Deepika padukon during enquiry)

रणवीर सिंह उपस्थित राहण्याबद्दल कोणतेही विनंती पत्र मिळाले नाही, एनसीबीचा दावा
Follow us on

मुंबई : एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) काल रात्री मुंबईत दाखल झाली आहे. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे. दीपिकाला डिप्रेशनचा त्रास असल्याने या चौकशी दरम्यान दीपिकाच्यासोबत राहता यावे म्हणून रणवीर सिंहने (Ranveer Singh) एनसीबीला विनंती केली असल्याची चर्चा होती. मात्र,तशी कोणतीही परवानगी मागण्यात आली नसल्याचे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.(Ranveer Singh wrote letter to NCB to let him join Deepika padukon during enquiry)

या सगळ्या दरम्यान गोव्याहून परतल्यामुळे आज (25 सप्टेंबर) दीपिकाची कोव्हिड टेस्ट (Corona Test) होण्याचीही शक्यता आहे. या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर ती चौकशीला सामोरी जाणार असल्याचे कळते आहे.

दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंहही (Ranveer Singh) वकिलांची जुळवाजुळव करत आहे. चौकशी दरम्यान रणवीरने दीपिकासोबत राहण्याची परवानगी मागितली असल्याचे बोलले जात होते. मात्र, रणवीर सिंह यांच्या उपस्थिती बाबत दीपिका यांनी कोणताही प्रकारे संपर्क केलेला नाही. दीपिका यांनी शेवटचा मेल त्या चौकशीसाठी हजर राहत असल्याचा पाठवला आहे, असा खुलासा केपीएस मल्होत्रा यांनी केला आहे. (Ranveer Singh wrote letter to NCB to let him join Deepika padukon during enquiry)

दीपिका, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसह गोव्यात शकुन बात्राच्या (Shakun Batra) आगमी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. मात्र, एनसीबीने समन्स बजावल्यानंतर दीपिकाने तातडीने चित्रीकरण थांबवले. या प्रकरणात नाव आल्यानंतर 12 वकिलांची फौज दीपिकाच्या दिमतीला लागली.

दीपिकाचे नाव या प्रकरणात येताच एनसीबीने समन्स बजावल्याने तिचा पती अभिनेता रणवीर सिंहही काळजीत आहे. रणवीर सिंह व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सतत दीपिकाच्या (Deepika Padukone) संपर्कात राहत होता.

बड्या बॉलिवूड अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंहला (Rakul Preet Singh) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे.

सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा (Simone Khambata) यांना काल (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले होते. सिमॉनने एनसीबी कार्यालय गाठले, मात्र रकुलने समन्स मिळाले नसल्याचा दावा करत चौकशीला हजर राहण्याचे टाळले. मात्र, ती शुक्रवारी (25 सप्टेंबर) एनसीबी कार्यालयात चौकशी करता हजर झाली आहे.

अशी अडकली दीपिका

दीपिका आणि श्रद्धा कपूरचे नाव सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत समोर आले आहे. तर, मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबतचे व्हॉट्स अ‍ॅप चॅटही NCB च्या हाती लागले आहेत. त्या कथित चॅटमध्ये दीपिका करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’? करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो… पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. जर म्हणशील तर अमितला विचारते.’ परत दीपिका मेसेज करते. ‘हो प्लीज’. काही वेळानं करिश्मा उत्तर देते, ‘अमित घेऊन येत आहे.’ यावर दीपिका विचारते, ‘हॅश आहे का?’ त्यावर करिश्मा म्हणते की, ‘हॅश नाही गांजा आहे.’

संबंधित बातम्या :

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच

Deepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ कळवली

(Ranveer Singh wrote letter to NCB to let him join Deepika padukon during enquiry)