Comet NEOWISE | दुर्मिळ धुमकेतू 22-23 जुलैला पृथ्वीच्या सर्वात जवळ, मग 6400 वर्षांनीच दर्शन

| Updated on: Jul 20, 2020 | 8:57 PM

हा NEOWISE धुमकेतू आता पुढे सहा हजार 400 वर्षांनंतर दिसणार आहे. म्हणजे आता वर्तमान काळात जिवंत असलेल्या लोकांच्या हजारो पिढ्यांनंतर हा धुमकेतू दिसणार आहे.

Comet NEOWISE | दुर्मिळ धुमकेतू 22-23 जुलैला पृथ्वीच्या सर्वात जवळ, मग 6400 वर्षांनीच दर्शन
Follow us on

Comet NEOWISE : गेल्या काही दिवसांपासून आकाशात एक दुर्मिळ धुमकेतू (Rare Comet NEOWISE) दिसत आहे. हा धुमकेतू सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. निळा आणि हिरवा प्रकाश असलेल्या या धुमकेतूचा शोध 27 मार्चला लावण्यात आला होता. अवकाश वैज्ञानिकांनी या धुकेतूला NEOWISE असं नाव दिलं आहे (Rare Comet NEOWISE).

हा NEOWISE धुमकेतू आता पुढे सहा हजार 400 वर्षांनंतर दिसणार आहे. म्हणजे आता वर्तमान काळात जिवंत असलेल्या लोकांच्या हजारो पिढ्यांनंतर हा धुमकेतू दिसणार आहे. त्यामुळे या धुमकेतूला अत्यंत दुर्मिळ मानलं जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

3 जुलैला हा धुमकेतू सूर्याची परिक्रमा करुन थेट पृथ्वीच्या दिशेने आला. 22 आणि 23 जुलैला हा धुमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. 23 जुलैला या धुमकेतूचं पृथ्वीपासूनचं अंतर 200 मिलीअन किमी म्हणजेच 20 कोटी किमी इतकं असेल. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतराच्या शेकडो पट जास्त आहे. चंद्र पृथ्वीपासून 3 लाख किमी दूर आहे.

सध्या हा धूमकेतू पृथ्वीपासून जवळपास 132 मिलिअर दूर आहे. जेव्हा हा पृथ्वीजवळून जाईल तेव्हा याचा प्रकाश तितका नसेल जितका आता आहे. त्याचा प्रकाश थोडा कमी होईल. जसजसा हा धुमकेतू सूर्यापासून दूर होईल, त्याची लांब शेपूटही छोट्या आकाराची दिसू लागेल (Rare Comet NEOWISE).

  • धुमकेतूला टेल स्टारही म्हणतात. धुमकेतूची शेपूट धुळ, बर्फ यांचं एकत्रिकरण असतं. हे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन चमकतात.
  • 20 जुलैपर्यंत हा धुमकेतूने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला होता. गेल्या 3 जुलैला हा धुमकेतू सुर्याच्या सर्वात जवळ होता.
  • या धुमकेतूला आपल्या सौर मंडळाची अंतर्गत कक्षा पूर्ण होण्यासाठी साडेचार हजार वर्षे लागतात.
  • या धुमकेतूची गती 40 मैल प्रती सेकंद आहे. या धुमकेतूला बाह्य कक्षा पार करण्यासाठी संपूर्ण साडेसहा हजार वर्षे लागतील.

संपूर्ण जुलै महिन्यात हा धुमकेतू दिसणार

या धुमकेतूबाबत विशेष म्हणजे हा संपूर्ण जुलै महिन्यात दिसणार आहे. युरोपमध्ये हा धुमकेतू पाहण्यासाठी सध्या खूप गर्दी आहे. वैज्ञानिकांच्या मते, या धुमकेतूचा प्रकाश संपूर्ण महिना पाहायला मिळेल. यापूर्वी 1990 मध्ये अशा प्रकारचा धुमकेतू पाहायला मिळाला होता.

मात्र, भारतात सध्या मान्सून असल्याने आकाश ढगाळ असतं. त्यामुळे भारतात हा धुमकेतू दिसणे कठिण आहे (Rare Comet NEOWISE).

संबंधित बातम्या :

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा