कोकणचो शिमगो… रत्नागिरीत शिमगोत्सवाची धूम; भास्कर जाधवांनी पालखी नाचवली

Bhaskar Jadhav on Kokan Shimgotsav Palkhi : भास्कर जाधव यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाले, लहानपणीची शिमग्याची पालखी म्हणजे... कोकणात शिमग्याच्या पालखीचा उत्साह... कोकणात ठिकठिकाणी होळीची पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. त्याचे खास फोटो अन् बातमी वाचा सविस्तर...

कोकणचो शिमगो... रत्नागिरीत शिमगोत्सवाची धूम; भास्कर जाधवांनी पालखी नाचवली
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 10:50 AM

राज्यात सध्या सगळीकडे होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर पाहायला मिळतोय. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षातून एक वेळा होणारी भेट पाहण्यासाठी भाविक आतूर होते. ढोल ताशांच्या गजरात डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा सोहळा पाहायला मिळाला. या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाला सुरवात होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनीही शिमगोत्सवात हजेरी लावली. यावेळी जाधव यांनीही पालखी नाचवली.

भास्कर जाधव काय म्हणाले?

संपूर्ण कोकण उत्सवप्रिय कोकण म्हणून ओळखला जातो… पालखी नाचवणे एक प्रकारची पर्वणी असते. कितीही उच्च पदावर गेलो तरी ही आमची श्रद्धा आहे. सामान्य ग्रामस्थ म्हणून पालखी नाचवीत असतो. त्यात आपली मुलं ही असतात. पालखीचं वजन खूप असतं. त्यातही एवढं वजन घेऊन एक एक पाऊल टाकणे कौशल्य असतं, असं भास्कर जाधव म्हणाले.

Bhaskar Jadhav

लहानपणीच्या आठवणींना उजाळा

मी लहान असताना वडील माझ्या खांद्यावर पालखी द्यायचे. 55 ते 57 वर्षांपासून पालखी नाचवतोय. शिमग्यातील संकसूर… गोमू.. ही नमन आणि परंपरा जपलेली कला आहे. त्यांच्यावर टीका करणं म्हणजे कलेचा अपमान आहे. श्रद्धेचा अपमान करणं ही राजकारणातील काही लोकांना लागलेली विकृती… ते परंपरांचा अपमान करतात माझ्या आयुष्याला संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली जातेय, असं म्हणत भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

गोंदियात होळीचा उत्साह

राज्यभर होळी सण साजरा केला जात आहे. गोंदियाही होळीचा उत्साह पाहायला मिळाला. शासनाच्या मिळत नसलेल्या योजनांची नागरिकांनी होळी केली. आमचा गाव आमचा बहिष्कारावर द्वारीका, यशवंत नगर, श्रीरामटोली एकवटले. आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीने न्याय प्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी एक मताने निर्धार केला आहे. नागरिकांनी माझा गाव माझा बहिष्कार घोषणा देत लोकसभेच्या निवडणुक मतदानावर बहिष्कार घालण्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतला.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.