धर्माच्या पलिकडे माणुसकीचं नातं, पठाण मामाकडून हिंदू भाचींचे कन्यादान

सविता भुसारी या दरवर्षी बाबाभाई पठाण यांना राखी बांधतात. त्यामुळे मुलींच्या लग्नात बाबाभाईंनी मामाची भूमिका खंबीरपणे निभावली (Relationship of humanity beyond religion).

धर्माच्या पलिकडे माणुसकीचं नातं, पठाण मामाकडून हिंदू भाचींचे कन्यादान
| Updated on: Aug 23, 2020 | 8:17 AM

अहमदनगर : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच गोष्टीचा प्रत्यय शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभातून दिसून आला. या लग्नात मुस्लिम समाजाच्या मामाने दोन हिंदू भाचींचे कन्यादान केले. त्यामुळे या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत (Relationship of humanity beyond religion).

बोधेगावच्या सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. संसाराच्या वाटेत पतीने अर्ध्यावरच साथ सोडल्याने त्या माहेरी आल्या. तिथेच त्यांनी दोन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं. बोधेगावातील त्यांच्या घराशेजारी बाबा पठाण नावाचे गृहस्थ राहतात. सविता भुसारी यांचे ते मानलेले भाऊ. त्यामुळे सविता यांच्या मुलींच्या लग्नात बाबा पठाण मामा म्हणून उभे राहिले.

सविता भुसारी या दरवर्षी पठाण यांना राखी बांधतात. त्यामुळे मुलींच्या लग्नात त्यांनी मामाची भूमिका खंबीरपणे निभावली. भुसारी कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली. तर धाकटी सावरी हिची बारावी झाली (Relationship of humanity beyond religion).

दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तिथेही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न लावून दिले. त्यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन या लग्नात घडले.

हेही वाचा : राज्यात सामान आणि प्रवाशांच्या हालचालींवरील निर्बंध हटवले, अनिल देशमुखांची माहिती