Pune crime | प्रवासभाडे देण्यास पैसे नसल्याने रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी रिक्षातून प्रवास करत होती. या रिक्षा चालकाने मुलीकडे प्रवास भाडे मागितले मात्र तिने पैसे नाहीत,  हे सांगीतले याचाच फायदा घेत रिक्षा चालकाने मुलीला रेसकोर्स येथील झाडीत नेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले

Pune crime | प्रवासभाडे देण्यास पैसे नसल्याने रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीसोबत केले हे कृत्य
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 4:39 PM

पुणे – शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीजवळ जवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याचा गैरफायदा घेत हे कृत्य केले आहे.

नेमकं काय घडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी रिक्षातून प्रवास करत होती. या रिक्षा चालकाने मुलीकडे प्रवास भाडे मागितले मात्र तिने पैसे नाहीत,  हे सांगीतले याचाच फायदा घेत रिक्षा चालकाने मुलीला रेसकोर्स येथील झाडीत नेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार फुलो पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) यांना ताक केली आहे. पीडित मुलीनेदिलेल्या तक्रारीनुसार गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आणि 5 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार घडला.

यांनतर पुन्हा आरोपीने आपल्या मित्रांच्यासोबत येत फिर्यादी मुलगी व तिच्या मैत्रीणीसोबत जबरदस्ती करत छेडछाड काढली. आरोपीच्या मित्रानेही पीडितेची छेडछाड केली असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पोलिसानी तिन्ही आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडं तपास सुरु आहे.

झोपेच्या स्थितीवरून ठरेल तुमचे आरोग्य, निरोगी हृदय आणि सुरक्षित गरोदरपणामध्ये घ्या झोपेची अश्या प्रकारे काळजी!!

निर्णयांमध्ये एकवाक्यता हवी, मात्र राज्यात रावणासारखे दहा तोंडाचे सरकार; निर्बंधांवरून भातखळकरांचा निशाणा

Viral Video : वृद्ध महिलेकडून स्ट्रॉबेरी विकत घेणाऱ्याचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, काय केलं असं? पाहा व्हिडिओ