झोपेच्या स्थितीवरून ठरेल तुमचे आरोग्य, निरोगी हृदय आणि सुरक्षित गरोदरपणामध्ये घ्या झोपेची अश्या प्रकारे काळजी!!

झोपेच्या स्थितीवरून ठरेल तुमचे आरोग्य, निरोगी हृदय आणि सुरक्षित गरोदरपणामध्ये घ्या झोपेची अश्या प्रकारे काळजी!!
झोप

झोपेचा थेट संबंध हा मानवी शरीराशी असतो,असे अनेकदा म्हंटले जाते आणि याची प्रचिती आपल्याला येते परंतु आपण ज्या स्थितीत झोपतो त्या स्थितीचा देखील परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.ब‍र्लिन येथील स्‍लीप स्‍पेशलिस्‍ट अलेक्‍जेंडर ब्‍लाउ यांचे असे म्हणणे आहे की, आपण ज्या स्थितीत झोपतो त्याचा सर्वस्वी परीणाम आपल्या सर्व अवयवांवर होतो...जाणून घेऊया यामागील कारण....

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 07, 2022 | 4:33 PM

झोपेचा थेट संबंध हा मानवी शरीराशी असतो असे अनेकदा म्हंटले जाते आणि याची प्रचिती आपल्याला येते परंतु आपण ज्या स्थितीत झोपतो त्या स्थितीचा देखील परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो म्हणजेच मनुष्य कोणत्या बाजूला झोपतो यावरून सुद्धा त्याच्या शरीरावर परिणाम जाणवू लागतो.ब‍र्लिन येथील स्‍लीप स्‍पेशलिस्‍ट अलेक्‍जेंडर ब्‍लाउ यांच्या मते, आपल्या झोपण्याच्या स्थितीवरून आपल्या शरीरावरील सर्व अवयवांवर त्याचा परिणाम जाणवतो जसे की फुफ्फुसे,हृदय आणि मेंदू. आपले शरीर आणि शरीरातील इतर अन्य अवयव जर निरोगी ठेवायचे असतील तर अशा वेळी नेमकी कशा पद्धतीने झोपायचे हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहेत.

बर्लिन येथील कार्डियोलॉजिस्‍ट आणि इमरजेंसी फ‍िज‍िशियन डाइट्रिच एंड्रेसन यांचे असे म्हणणे आहे की,जर एखाद्या व्यक्तीला हृदय संबंधित काही आजार असतील तर अशा वेळी त्या व्यक्तीने उजव्या बाजूला तोंड करून झोपायला पाहिजे. अशा स्थितीमध्ये झोपले नाही तर आपले हृदय आणि पोट यांच्यावर जास्त दबाव निर्माण होत नाही याशिवाय छाती मध्ये जळजळ आणि ॲसिड निर्माण होण्याची शक्यता सुद्धा कमी असते.

ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये पब्लिश झालेल्या रिसर्च अनुसार असे मानण्यात आले आहे की, गरोदरपणाच्या काळामध्ये ज्या महिला डाव्या बाजूला तोंड करून झोपतात, अशा महिलांना गरोदरपणात बाळा संदर्भात कोणत्याच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये महिलांना पाठीवर न झोपण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीरातील कोणताही रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होऊ नये तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा सुद्धा सुरळीत असावी हा एक त्यामागचा हेतू असतो म्हणूनच अनेकदा डॉक्टर महिलांना डाव्या बाजूला तोंड करुन झोपण्याचा सल्ला देत असतात.

स्‍लीप स्‍पेशलिस्‍ट अलेक्‍जेंडर ब्‍लाउ यांच्या मते, जर तुम्हाला फुफ्फुसे संबंधित कोणतेही आजार झाले असतील किंवा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर अशा वेळी एका बाजूला तोंड करून झोपणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जाते, या झोपण्याच्या स्थितीवरून आपले फुफ्फुसे योग्य पद्धतीने कार्य करू लागते ,असे करून सुद्धा तुम्हाला एखादा त्रास होत असेल तर अशा वेळी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

तज्ञ मंडळी यांच्या मते जर आपल्याला आपला मेंदू निरोगी आणि नेहमी ॲक्टिव ठेवायचा असेल तर अशावेळी कोणत्याही एका बाजूला तोंड करून झोपावे हे आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून उत्तम मानले जाते. नुकतेच केले गेलेल्या एका संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की, अशा स्थितीमध्ये झोपल्याने न्‍यूरोलॉजिकल म्हणजेच मेंदू संदर्भातील जे काही आजार असतात ते उद्भवण्याची शक्यता व धोका अगदीच कमी असतो आणि म्हणूनच आपल्याला आपला मेंदू नेहमीच सक्रीय व तंदुरुस्त तसेच स्मरणशक्ती मजबूत बनवायची असेल तर अशावेळी आपल्याला आपल्या झोपण्याच्या स्थितीवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

मुंबई, ठाणे, पुणे वगळता राज्यातील इतर भागात तुर्तास शाळा बंदचा निर्णय नाही; …तर निर्बंध अधिक कडक होणार – राजेश टोपे

Pune crime| पुण्यात रस्त्यावर श्वानाने घाण का केली?म्हणत चिडलेल्या तरुणाने श्वान मालकाला ‘धुतले’ ; वाचा सविस्तर

Fadnavis| अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा; नोटीस ट्वीट करून निर्वाणीचा इशारा…!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें