
मुक्ताईनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.खासदार रक्षाताई खडसे यांच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठा समाजातर्फे ढोल बजाओ आंदोलन करत निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.

सकल मराठा समाजाचे आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलन, मुक्ताईनगर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले

आमदार आणि खासदारांना निवेदन देण्यासाठी जमलेले मराठा समाजातील आंदोलक

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याघराबाहेर सकल मराठा समजाचे आंदोलन