17 वर्ष देशाची सेवा करुन गावात परतणाऱ्या जवानाचं जंगी स्वागत

बीड : सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच क्षण बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. 17 वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी […]

17 वर्ष देशाची सेवा करुन गावात परतणाऱ्या जवानाचं जंगी स्वागत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बीड : सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच क्षण बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. 17 वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका जवानाचं बीड जिल्ह्यात अख्ख्या गावाने स्वागत केलं.

प्रकाश खारोडे यांनी 17 वर्ष सीमेवर देशसेवा केली. सेवानिवृत्त होऊन गावी आल्यानंतर घोड्यावर बसवून, बँड बाजा वाजवून त्यांचं स्वागत केलं. बँडच्या तालावर ताल धरणाऱ्या लेझीम पथकनेही या स्वागतामध्ये भर टाकली. संपूर्ण गाव पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी उभं होतं. बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील हे सर्व सेलिब्रेशन आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रकाश खारोडे हे सैन्य दलातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना अनोखी भेट म्हणून गावातील नागरिकांनी एक समिती तयार केली. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून गावभरात स्वागताचे बॅनर्स लावले होते. घरोघरी रांगोळी काढण्यात आली. अचानक झालेलं हे स्वागत पाहून जवान प्रकाश खारोडे भारावून गेले.

देशसेवा करून गावी पोहोचल्यावर संपूर्ण गाव भावुक झालं होतं. जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावंच नव्हे, तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली. यावेळी पूर्ण गाव सजून-धजून उभं होतं. सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबीयांना… जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते. जवानाचा गावात प्रवेश होताच तोफांची सलामी देऊन कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं. 17 वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

बीड जिल्ह्यातील शेकडो तरुण आज देशसेवेसाठी सैन्य दलात आहेत. कर्तव्य बजावत असताना बीड जिल्ह्यातील 21 जवानांनी आजपर्यंत आपलं बलिदान दिलंय. मात्र 17 वर्ष देशसेवा करून सुखरूप परतणाऱ्या जवानाचं अनोखं स्वागत करून शिरूरकरांनी पायंडा पाडलेल्या प्रथेची चर्चा जिल्हाभरात रंगत आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.