गुंडांच्या बैठका घडवून आणणारा माजी पोलीस अधिकारी कोण ?, संजय राऊत कुणाची पोलखोल करणार?

महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडाना पोसत आहेत. मुख्यमंत्र्यांना 'वर्षा'वर गुंडाच्या टोळ्या येऊन भेटतात. वर्षावर, मंत्रालयात गुंडाच्या टोळ्यांच्या म्होरक्यांसोबत बैठका होतात, असे सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

गुंडांच्या बैठका घडवून आणणारा माजी पोलीस अधिकारी कोण ?, संजय राऊत कुणाची पोलखोल करणार?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 10:42 AM

नवी दिल्ली | 6 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडाना पोसत आहेत. मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’वर गुंडाच्या टोळ्या येऊन भेटतात. वर्षावर, मंत्रालयात गुंडाच्या टोळ्यांच्या म्होरक्यांसोबत बैठका होतात, असे सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईचा माजी पोलिस अधिकारी हे सर्व घडवतोय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि महापालिकेत देखील विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली. त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांना पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

रोज एक फोटो ट्विट करणार, राऊतांचा इशारा

‘वर्षा’बंगल्यावर, मंत्रालयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या येऊन भेटत आहेत. खून, दरोडे , अत्याचार अशा गुन्ह्यांसाठी आत असलेले, जामीनवर बाहेर आलेले हे गुंड आणि त्यांच्या टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतात ? त्या गुंड टोळ्यांचा वापर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आपले मुख्यमंत्री करणार आहेत का ? असा उपरोधिक सवालही राऊत यांनी विचारला. अजित पवारांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गुंडांची रांग लागली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत. आज मी एक फोटो टाकलाय,तसा मी रोज टाकणार आहे असा इशाराही राऊत यांनी दिला. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी या गुंडांच्या बैठका घडवून आणतो आहे, याचा लवकर मी पर्दाफाश करणार आहे, असंही त्यांनी सुनावलं.

पंतप्रधानांवर साधला निशाणा

महाराष्ट्रात जे सुरू आहे,  पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे (भाजप) आमदार गोळीबार करत आहेत, या सगळ्या विषयांवर पंतप्रधान मोदी काही बोलले का ? त्यावर त्यांचं मौन का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. देशातील समस्यांवर मोदी काहीच बोलले नाही. तासाभराच्या भाषणात निम्मा वेळ तर मोदी फक्त काँग्रेसवर टीका करत होते. नेहरू, इंदिरा गांधीवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा असा सल्ला देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.

भाजपकडेसुद्धा एकच प्रॉडक्ट, त्यांच्याकडे मोदींशिवाय दुसरं काही आहे का ?

हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे. चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाने केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहून तुम्हाला सत्य कळेल. भाजपकडे सुद्धा एकच प्रॉडक्ट आहे, त्यांच्याकडे मोदींशिवाय दुसरं काही आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून नरेंद्र मोदी पंतप्रधान कार्यालयात बसले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.