आला रे आला ‘सिंबा’ आला, ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खान स्टारर ‘सिंबा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा ‘सिंबा’ हा डेब्यूनंतरचा दुसरा सिनेमा आहे. ‘सिंबा’चं सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने करत असल्याने या सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्सचा समावेश करण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या सुरुवातीला आणि शेवटी बॉलिवूडचा […]

आला रे आला ‘सिंबा’ आला, ट्रेलर रिलीज
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खान स्टारर ‘सिंबा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा ‘सिंबा’ हा डेब्यूनंतरचा दुसरा सिनेमा आहे. ‘सिंबा’चं सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने करत असल्याने या सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्सचा समावेश करण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या सुरुवातीला आणि शेवटी बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण दिसत आहे. त्यामुळे ‘सिंबा’ हा सिनेमा सिंघम सिनेमाचा पुढचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हे गुपित सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडणार आहे.

‘सिंबा’ हा ‘दबंग’स्टाईल पोलीस अधिकारी दाखवण्यात आला आहे. केवळ पैसै कमावण्याच्या उद्देशाने सिंबा पोलीस खात्यात भर्ती होतो. मात्र, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ बनून सिंबा वावरतो. तसेच ट्रेलरमध्ये सिंघम सिनेमातील संवाद आणि सीन्स देखील दिसत आहेत. सुमारे 2.54 मिनिटांचा ट्रेलरला चाहते चांगलीच पंसती देत आहेत.

‘सिंबा’ हा सिनेमा ‘टेंपर’ या तेलुगू सिनेमावर आधारित हिंदी रिमेक आहे. तेलुगू सिनेमात ज्युनिअर एनटीआरने मुख्य भुमिका साकारली होती. या सिनेमात रणवीर सिंहने सिंबा या पोलिसाची भूमिका केली आहे. तर सारा अली खान ही अभिनेत्रीच्या भुमिकेत आहे.

2018 मध्ये रणवीरचा ‘पद्मावत’नंतर सिंबा हा दुसरा सिनेमा आहे. रोहित शेट्टीने निर्मिती केलेल्या सिनेमात रणवीर पहिल्यादांच काम करत आहे. त्यामुळे रणवीर रोहीत शेट्टीसोबत काम करण्यासाठी खूप उत्साही होता हे स्वत: रणवीरने या आधी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. तर या सिनेमात मराठमोळा कलाकार सिद्धार्थ जाधव देखील झळकणार आहे.

हा सिनेमा ख्रिसमसच्या मुहूर्तावर 28 डिसेंबरला रिलीज होईल. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोनच्या लग्नानंतर रणवीरचा हा पहिला सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना सिंबा सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.

पाहा ट्रेलर :