PHOTO | भल्लालदेवचा शानदार विवाहसोहळा, अभिनेता राणा दग्गुबातीच्या लग्नाचे फोटो
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीने प्रेयसी मिहिका बजाजसोबत लग्न केलं आहे (Rana Daggubati wedding).

- प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीने प्रेयसी मिहिका बजाजसोबत लग्न केलं आहे (Rana Daggubati wedding). कोरोनाच्या काळात राणाने काल (8 ऑगस्ट) हैद्राबादच्या रामानायडू स्टूडिओमध्ये राणा आणि मिहिकाचे लग्न पार पडले.
- दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे लग्न तेलगू आणि मारवाडी दोन्ही पद्धतीने करण्यात आले.
- लग्नात मिहिकाने गोल्डन आणि क्रीम कॉम्बिनेशनचा लेहंगा घातला होता. ज्यावर कोरल रंगाच्या धाग्याचा दुपट्टा होता. तर राणाने क्रीम आणि गोल्डन मिक्स रंगाचा कुर्ता आणि धोती घातली होती. त्यासोबत त्याने गोल्डन रंगाचा अंगवस्त्रही घातले होते. दोघेही लग्नात खूप छान दिसत होते.
- या लग्नात फक्त 30 लोकांचा समावेश होता. ज्यामध्ये राणा आणि मिहिकाच्या कुटुंबासह दोघांच्या जवळचे मित्र होते. त्यासोबत दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेते वेंकटेश, सामंथा अक्किनेनी, राम चरण, अल्लू अर्जून आणि नागा चैतन्य यांनीही या लग्नात हजेरी लावली.
- राम चरण आपल्या पत्नीसोबत आपल्या खास मित्राच्या लग्नात उपस्थित राहिला होता. याचा एक फोटोही सोशल मीडियावर राम चरणने शेअर केला आहे.
- लग्नात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तसेच लग्नात उपस्थित राहिलेल्या सर्वांची कोरोना तपासणीही करण्यात आली होती. तसेच लग्न सभागृहात सतत सॅनिटायझर करण्यात आले होते.
- साखरपुड्या दरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us