श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडचा भारतात तीन महिने मुक्काम

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

कोलंबो : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड भारतात तीन महिने राहिला होता, अशी माहिती दहशतवादी जरहान हाशिमच्या कॉल रेकॉर्डवरुन उघड झाली आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा केरळ आणि तामिळनाडूमधील अनेक संशयितांवर लक्ष ठेवून आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या वर्षी जहरान हाशिम भारतात तीन महिने राहिला होता. कॉल रेकॉर्डमधून ही माहिती समोर […]

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडचा भारतात तीन महिने मुक्काम
Follow us on

कोलंबो : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड भारतात तीन महिने राहिला होता, अशी माहिती दहशतवादी जरहान हाशिमच्या कॉल रेकॉर्डवरुन उघड झाली आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा केरळ आणि तामिळनाडूमधील अनेक संशयितांवर लक्ष ठेवून आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेल्या वर्षी जहरान हाशिम भारतात तीन महिने राहिला होता. कॉल रेकॉर्डमधून ही माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात हाशिमचा हात आहे. हाशिमनेच आत्मघातकी हल्ला करत श्रीलंकेतील चर्चमध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा जीव घेतला, असा संशय सुरक्षा अधिकाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे.

हाशिमचा भारताशी काय संबध होता, याबद्दलची चौकशी सुरक्षा अधिकारी करत आहेत. सध्या केरळमधील तीन संशयीत व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. खळबळजनक गोष्ट म्हणजे, यातील एक जण केरळमधील पलक्कडचा रहिवाशी असून रियास अबूबकर उर्फ अबू दुजाना असं त्याचं नाव आहे. याशिवाय सुरक्षा अधिकाऱ्यांनी कासरगोडमधीलही दोन व्यक्तींच्या घराची तपासणी केली आहे.

आयएसआयएसमध्ये समावेश करणाऱ्या मुलांसोबत रियासचा संपर्क

रियासच्या घरावर रविवारी सुरक्षा यंत्रणेने छापा मारुन त्याला अटक केली. 2016 मध्ये केरळचे 22 तरुण आयएसआयएसमध्ये समावेश करण्यासाठी अफगाणिस्ताला जाण्याच्या तयारीत होते. या संबधित घटनेची चौकशी करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

भारतीय सुरक्षा यंत्रणेचे आयजी अलोक मित्तल म्हणाले, “अबू दुजानाने सांगितले की, मी वर्षभरापासून अनेकदा जहरान हाशिमचे फोटो आणि व्हिडीओ पाहत होतो. शिवाय, झाकिर नाईकपासून मी प्रभावित होत होतो. मला केरळमध्ये एक आत्मघातकी हल्ला करायचा होता”.

NTJ पासून हाशिम वेगळा झालेला?

अधिकाऱ्यांना संशय आहे की, हाशिमने श्रीलंकेतील दहशतवादी संघटना नॅशनल तौहीद जमातपासून (NTJ)  वेगळे होऊन आपली नवीन संघटना तयार केली आहे. श्रीलंकेतील बॉम्ब हल्ल्यात NTJ ला जबाबदार ठरवण्यात आले होते.

एका सुरक्षा अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला म्हटले, “नवीन संघटनेचे नाव नेशन ऑफ तौहीदी जमात ठेवण्यात आले आहे. यामध्ये हाशिम जवळपास 35 मुलांसोबत काम करत आहे. यामधील काही मुलांनी हा बॉम्ब हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे”

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटात 310 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या स्फोटातील मृतांमध्ये 3 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृत्यू झालेल्या तीन भारतीय नागरिकांची नावे आहेत.

श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी 8 बॉम्बस्फोट झाले. ईस्टर संडेच्या निमित्ताने कोलंबो शहरात उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी सकाळी 8.45 च्या सुमारास कोलंबोमधील सेंट अँटनी चर्च येथे स्फोट झाला. त्यानंतर थोड्या वेळाने सेंट सेबस्टियन चर्च (नेगंबो), शांग्रिला फाईव्ह स्टार हॉटेल, सिनमन ग्रँड फाईव्ह स्टार हॉटेल, किंग्सबरी फाईव्ह स्टार हॉटेल, सेंट अँथनी चर्च (कोलंबो) या ठिकाणी स्फोट झाले.