SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात….

| Updated on: Jul 16, 2020 | 1:15 PM

दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, निकाल येण्यास अजून थोडासा वेळ लागेल, असं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या.

SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात....
Follow us on

पुणे : बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. मात्र आता राज्यातील एसएससी बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. (SSC Board Chairperson Shakuntala Kale on SSC Results Date)

“लॉकडाऊनच्या काळात उत्तरपत्रिका तपासणी, शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षकांकडून घरुन पेपर तपासून घेतले. गावागावात विभागलेले पेपर गोळा करण्याचं मोठं आवाहन होते. मातर रेड झोनमधूनही पेपर गोळा केले, एकही कार्यालय बंद नव्हते, तीन शिफ्टमध्ये काम सुरु होते” अशी माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

दहावीच्या परीक्षेनंतर काही पेपर पोस्ट ऑफिसमध्ये अडकले होते. मात्र आता ते वाटप झालं, ते काम अंतिम टप्प्यात आहे, निकाल येण्यास अजून थोडासा वेळ लागेल, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा : बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के गुण होते? शकुंतला काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलैचा उत्तरार्ध आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं सांगितलं होतं.

बारावीचा निकाल जाहीर

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून तिथे 92.50 टक्के, तर मुंबई विभागातून 89.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल.

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के
सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के

कोकण – 95.89 टक्के
पुणे – 92.50 टक्के
कोल्हापूर – 92.42 टक्के
अमरावती – 92.09 टक्के
नागपूर – 91.65 टक्के
लातूर – 89.79 टक्के
मुंबई –89.35 टक्के
नाशिक – 88.87 टक्के
औरंगाबाद – 88.18 टक्के

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

कोणत्या शाखेचा निकाल किती टक्के?

विज्ञान – 96.93 टक्के
वाणिज्य – 91.27
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – 86.07
कला – 82.63

निकालाची वैशिष्ट्ये

परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14,13,687
उत्तीर्ण विद्यार्थी – 12,81,712
उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – 93.88
उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – 88.04
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 93.57 टक्के उत्तीर्ण
पुनर्परीक्षार्थी निकाल – 39.03 टक्के उत्तीर्ण
154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल 

संबंधित बातम्या 

 बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%

बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

(SSC Board Chairperson Shakuntala Kale on SSC Results Date)