अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? बड्या नेत्याने केली थेट चौकशीची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या अपघातावरून रामदास कदम यांनी संशय व्यक्त केला. दादांच्या अपघात प्रकरणात सुनील तटकरे यांची चौकशी करावी, अशी माागणी रामदास कदम यांनी केली.

अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? बड्या नेत्याने केली थेट चौकशीची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Nov 09, 2026 | 1:38 PM

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी : अजितदादांच्या अपघाताला 10 महिने उलटल्यानंतरही काही नेत्यांकडून घातापाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहित पवार यांनीही अजितदादांच्या अपघाताची चौकशीची मागणी केली होती. अजितदादांच्या अपघात प्रकरणात रोहित पवार हे पत्रकार परिषद घेऊन आणखी एक खुलासा करणार आहेत. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेआधीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? असा सवाल करत रामदास कदम यांनी चौकशीची मागणी केली आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबो केला. रामदास कदम म्हणाले, ‘ लोक मला बोलत होते की, तटकरे बेईमान माणूस आहे. हा कोणाचा होणार नाही. नेमकं तसं झालं. त्याची वेळ निघून गेली. विधानसभेच्या निवडणुकीत योगेश कदम यांच्याविरोधात यांनी काम केलं. वैशिष्ट असे आहे की, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशी युती असताना गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना मदत केली. त्यांनी थेट ठाकरे गटाला मदत केली. तटकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. तू ज्या मेव्हण्याला सांगतो. त्याची माझ्या बाजूला बसायची लायकी नाही’.

Loading...

‘पोयनार धरणाच्या भूमीपूजनाला…पोयनार धरण म्हणजे तुमची सासरवाडी…अजित पवार आणि तुमच्यावर कोकणातील 16 धरणांचे आरोप होते.  70 हजार कोटींचे…त्यातील हे पोयनार धरण होते. गेल्या 25 वर्षांत हे काम बंद पडलं होतं. तटकरेंचं काम होतं  की, माझ्या 14 गावातील लोक पाण्यापासून वंचित राहत आहे. ते तुझे पाप होते. त्यादिवशी बोललो नाही. शेवटी औकात दाखवली. अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यावेळी आरोप मागे घेण्यात आले. ही जनता आहे. सर्व जाणून आहे. मला बोलायला लावू नका. माझं भाषण संपताना येतो. त्यानंतर थेट माझ्याच खुर्चीवर बसतो. माजी जिल्हापरिषद खाली बसले होते. प्रोटोकॉल वगैरे आहे का नाही. तो स्वत:ला तटकरे समजतोय का…राष्ट्रवादीचा अध्यक्ष समजतो का…आला निवडून..जिंकला. ही दादागिरी कशाला…त्याची औकात मी दाखवली. तटकरे..तुम्ही जास्त मस्ती दाखवली, तर तुम्हालाही सोडणार नाही.  औकातीत राहावे, असे कदम म्हणाले. तर अजितदादांच्या अपघात प्रकरणावर त्यांनी मोठं भाष्य केलं.  अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरे यांचा हात आहे का? असा सवाल करत रामदास कदम यांनी चौकशीची मागणी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us