AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Sangharsh Morcha : या सगळ्या षडयंत्रामागे कोल्हापुरातील नाकारलेला मंत्री….चंद्रकांत पाटीलबद्दल विवेकानंद पाटील काय म्हणाले?

Vivekanand Patil Gokul Sangarsh Morcha Speech: कोल्हापूरात गोकुळचा विषय आता चांगलाच तापला असून दसरा चौकात संघर्ष मोर्चा सुरु आहे. या मोर्चात विवेकानंद पाटील यांनी भाषण केले असून त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Gokul Sangharsh Morcha : या सगळ्या षडयंत्रामागे कोल्हापुरातील नाकारलेला मंत्री....चंद्रकांत पाटीलबद्दल विवेकानंद पाटील काय म्हणाले?
| Updated on: Nov 09, 2026 | 1:32 PM
Share

Vivekanand Patil Gokul Morcha: कोल्हापुरात गोकुळ दूध संघावरील शासन नियुक्त निवडीविरोधात वातावरण आता चांगलेच तापले आहेत. कोल्हापूरात गोकुळच्या प्रकरणावरुन सतेज पाटील यांचा संघर्ष मोर्चा सुरु आहे. दसरा चौकात हा मोर्चात सुरु आहे. या मोर्चाला आता विवेकानंद पाटील यांनी ही हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी भाषण केले आणि सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

विवेकानंद पाटील म्हणाले की, “२९ला मत मागितलेल्यांना हात दाखवा, लाथ दाखवली तरी चालेल. गोकुळच्या मोर्चात येत असताना मी ना राष्ट्रवादीचा माणूस, ना काँग्रेस, ना शिवसेनेचा, ना स्वाभिमानीचा, मी फक्त इथे शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलोय. मागील १० ते १५ दिवस गोकुळमध्ये काय खेळ सुरु आहे? ते आपण सगळ्यांनी पाहिल आहे.  आमच्याकडे एक गाण आहे गोकुळात नंदा घरी कृष्णा वाढतो आणि मथुरेत कंसमामा बोट मोडीतो, पण काळ आता बदलला आहे. गोकुळात नंदा घरी कृष्णा वाढवितो, आणि मंत्रालयात कंसमामा बोट मोडितो. अशी अवस्था आमच्यावाटेला आली आहे. गोकुळचे संचालक आहेत किती? २५ संचालक या गोकुळाने कोल्हापूरला दिल्या आहेत. या २५ मध्ये बंटी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी लढली आणि त्यांना १३ जागा मिळाली, आणि विरोधकांना १२ मिळाल्या. जर कोल्हापूरने बंटी पाटील यांना बहुमत दिलंय तर तिथला चेअरमॅन हा त्यांच्याच बहुमताचा बसला पाहिजे.”

पुढे ते म्हणाले की” मुख्यमंत्रीसाहेब म्हणाले की, कोल्हापूरचा गोकुळ हा फक्त एका जिल्हापुरती आहे. आम्हाला राज्यातील राजकर्त्यांना यात काही रस नाही, पण फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो, गोकुळची सत्ता तुम्हाला मिळावी म्हणून आमच्यासुद्धा म्हशी पळत नाही, अरे आमची म्हश पळते कारण आमच्या धन्या दूध मिळावं म्हणून, पण आमच्या दुधाचे लोणी काढायचे काम जर हे स्वीकृत म्हणून नामनिर्देशित, आम्हाला गोकुळसाठी चोरमॅन नकोय तर चेअरमॅन हवाय. पोडीचं दूध कसं खातोय शहारातील गोडी शहरामधला सर, नाजूक मॅडम साजूक तुपाची सोडतीये धार. या षडयंत्रामागे एक कोल्हापूरातील नाकारलेला एक मंत्री आहे, आणि ते कोल्हापूरात नसतात. ते सध्या पुण्यात राहतात.”

Follow Us
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा