‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’, सुरेश धस यांची घोषणा

| Updated on: Apr 04, 2020 | 7:07 PM

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’ अशी घोषणाही केली (Suresh Dhas criticize Dhananjay Munde).

धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा, सुरेश धस यांची घोषणा
Follow us on

बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’ अशी घोषणाही केली (Suresh Dhas criticize Dhananjay Munde). कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. कारखानदारांचे कारखाने सुरुच आहेत. ऊसतोड मजूरांवर मात्र दडपशाही करत पोलिसांकडून मारहाण होत आहे, असाही आरोप सुरेश धस यांनी केला.

सुरेश धस म्हणाले, “कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. कारखानदारांचे कारखाने सुरुच आहेत. ऊसतोड मजूरांवर मात्र दडपशाही करत पोलिसांकडून मारहाण होत आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून कसलीच अंमलबजावणी होत नाही. यातच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा वचक राहिलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे सध्या जिल्ह्यात नाहीत. ते कोठे आहेत हे कळत नाही. म्हणूनच मी ‘धनंजय मुंडे कळवा आणि हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करत आहे.”

“माझ्यावर सीमाबंदी तोडल्यानं गुन्हा, मग धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर का नाही?”

सुरेश धस म्हणाले, “मी ऊसतोड मजुरांसाठी सीमा बंदी कायदा तोडला. मात्र, जितेंद्र आव्हाड हे मुंबईवरुन सोलापूरला येतात. एवढंच नाही, तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील मुंबईहून बीडला कसे येऊ शकतात? मग त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत. कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी करण्यात येते आहे.”

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर खेडमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यात भाजप आमदार सुरेश धस हेही सहभागी झाल्याने त्यांच्यावरही जिल्हाबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या :
…तरच 14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊन निर्बंधांवर पुनर्विचार : राजेश टोपे

Corona LIVE : बीडमध्ये लॉकडाऊन दरम्यानही माजी मंत्र्यांचा कुटुंबासह प्रवास

पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांना अद्दल, 5,930 वाहनं जप्त, तर 2,727 जणांवर गुन्हा दाखल

धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा : अजित पवार

Suresh Dhas criticize Dhananjay Munde