फॉरेनची पाटलीन! स्वीडनची लेक बनली सांगलीची सून

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

सांगली : सांगलीमध्ये ‘फॉरेनची पाटलीन’ या सिनेमाचं कथानक काहीसं प्रत्यक्ष उतरल्याचं चित्र आहे. स्वीडनची लेक सांगलीतील मिरजमधील सूनबाई बनली आहे. स्वीडनच्या मेरियमने भारतीय संस्कृतीनुसार संदीपसोबत तिने लग्न केलं आहे. यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा गावात होत आहे. या लग्नाच्या रेशीमगाठी स्वीडनमध्ये जुळल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील संदीप पाटील यांनी आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण मिरजमध्ये घेतले आणि […]

फॉरेनची पाटलीन! स्वीडनची लेक बनली सांगलीची सून
Follow us on

सांगली : सांगलीमध्ये ‘फॉरेनची पाटलीन’ या सिनेमाचं कथानक काहीसं प्रत्यक्ष उतरल्याचं चित्र आहे. स्वीडनची लेक सांगलीतील मिरजमधील सूनबाई बनली आहे. स्वीडनच्या मेरियमने भारतीय संस्कृतीनुसार संदीपसोबत तिने लग्न केलं आहे. यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा गावात होत आहे. या लग्नाच्या रेशीमगाठी स्वीडनमध्ये जुळल्या होत्या.

सांगली जिल्ह्यातील संदीप पाटील यांनी आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण मिरजमध्ये घेतले आणि पुढील MBBS चे शिक्षण घेण्यासाठी तो रशियामध्ये गेला. यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी तो स्वीडन येथे गेला. याच दरम्यान संदीपची ओळख मिरियमसोबत झाली. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी घरात परवानगी घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. संदीप पाटील MD मेडिसिन डॉक्टर आहे, तर मिरियम फ्लेनेच ही रेडिओ लॉजिस्ट डॉक्टर आहे.

दोघांच्या घरात परवानगी मिळाल्यानंतर अखेर लग्नाची तारीख ठरली आणि 23 फेब्रुवारीला गोव्यात हळदीचा कार्यक्रम झाला. तर 24 फेब्रुवारीला हा ‘आंतरराष्ट्रीय’ विवाह सोहळा संपन्न झाला. नवरी मुलीच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, हा लग्न सोहळा भारतीय संस्कृतीने व्हावा. यावेळी मेरियमही मराठमोळी लूकमध्ये सुंदर दिसत होती. लग्न सोहळ्यासाठी स्वीडनहून मुलीकडील वऱ्हाडी मंडळी आली होती. गोव्यातील LPK वॉटर रिसॉर्टमध्ये हा विवाह संपन्न झाला. यावेळी स्वीडन, स्विझरलँड, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि नॉर्वे या देशातून नवरी मुलीचे पाहूणे आणि मित्र मंडळी आले होते.

परदेशातून आलेले पाहुणे ढोल ताश्याच्या ठोक्यावर मोठ्या उत्साहात नाचले आणि विशेष म्हणजे यावेळी परदेशी महिलांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे साड्या परिधान केल्या होत्या, तर पुरुषांनी नेहरु शर्ट आणि फेटे परिदान केले होते. नवरी मिरियनलाही महाराष्ट्रीयन पद्धतीने सजवण्यात आले होते. लग्नानंतर नव्या वधू-वराला 1920 सालच्या जुन्या व्हिंटेज कारमध्ये बसवून त्यांची वरात काढण्यात आली. यावेळी परदेशी पाहुण्यांनी ढोल ताश्याच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. तसेच नवरा नवरीनेही नृत्य केले.