मसूदवर कारवाईसाठी UN च्या प्रतिनिधीनेही धोनीची नीती वापरली

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

नवी दिल्ली : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवला. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला […]

मसूदवर कारवाईसाठी UN च्या प्रतिनिधीनेही धोनीची नीती वापरली
Follow us on

नवी दिल्ली : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवला. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत आडकाठी केली होती.

Big,small, all join together असं म्हणत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याची माहिती दिली. चीनने कालच चर्चेतून मार्ग काढण्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भारताच्या बाजूने भूमिका घेत यूएनएससीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं.

या सर्व कारवाईच्या काळात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नीती वापरल्याचं सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलंय. सय्यद अकबरुद्दीन यांच्या मते, 21 फेब्रुवारी रोजी यूएनएससीमध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला तो मुद्दा महत्त्वाचा होता. यामुळे प्रस्ताव मंजूर होणार हे निश्चित झालं होतं. मी एमएस धोनीच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवतो. एखादं लक्ष पूर्ण करताना तुम्ही जेवढा विचार करता, त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याकडे असतो. कधीही असं म्हणू नका, की वेळ संपली आहे, कधीही लवकर पराभव पत्करू नका, असं अकबरुद्दीन म्हणाले.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा फायदा काय?

मसूद पाकिस्तानमध्ये आहे हे सर्व जगाला माहित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला देशात ठेवणं पाकिस्तानला परवडणारं नाही. मसूद अजहरवर कारवाई न केल्यास विविध मार्गातून पाकिस्तानला एकटं पाडलं जाईल. परिणामी दबावातून मसूदवर कारवाई करावीच लागेल. याशिवाय मसूदला आता जगातील कोणत्याही देशात जाता येणार नाही. त्याची जगभरातील संपत्ती जप्त केली जाईल.