वर्ध्यात प्राध्यापिकेला पेटवणाऱ्या आरोपीला फाशी द्या, सर्वपक्षीयांकडून ‘हिंगणघाट बंद’ची हाक

प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे.

वर्ध्यात प्राध्यापिकेला पेटवणाऱ्या आरोपीला फाशी द्या, सर्वपक्षीयांकडून 'हिंगणघाट बंद'ची हाक
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 8:13 AM

वर्धा : वर्ध्यातील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून ‘हिंगणघाट बंद’ची हाक (Teacher Set Ablaze Hinganghat Bandh ) देण्यात आली आहे.

हिंगणघाटमधील तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची तीव्र लाट उमटली आहे. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज (मंगळवार 4 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे.

शहरातील विद्यार्थीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पीडित प्राध्यापिकेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचाही समावेश आहे.

हिंगणघाट शहरात काल (3 फेब्रुवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतणारा आरोपी विक्की नगराळे याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून कालच अटक करण्यात आली. बुट्टीबोरी पोलिसांनी ही कारवाई केली होती.

पीडित प्राध्यापिकेच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन कारवाईची मागणी केली होती. “पीडितेला जसा त्रास झाला, तसाच त्रास आरोपीलाही झाला पाहिजे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या”, अशी मागणी त्यांनी केली होती.

दहा दिवसांत चार्जशीट दाखल करुन फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी करु, असं आश्वासन पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनही हिंगणघाटमधील हल्ल्याची घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आरोपीवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देशमुख यांनी दिलं होतं.

काय घडलं नेमकं?

30 वर्षीय प्राध्यापिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विक्की नगराळे तिचा पाठलाग करायचा. नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

Teacher Set Ablaze Hinganghat Bandh

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.