भारतातील सर्वात श्रीमंत महिला, 4,62,88,11,00,000.00 रुपये संपत्ती

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं आहे. यासोबतच उद्योग क्षेत्रातही महिलांनी आज पुरुषांना स्पर्धात्मक आव्हान दिलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला आज भारताच्या सर्वात श्रीमंत महिलेबद्दल सांगणार आहोत. भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचं नाव सावित्री जिंदल आहे. सावित्री जिंदल या ‘जिंदल ग्रुप’च्या मालकीन आहेत. जिंदल ग्रुप स्टील, पॉवर, सीमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर […]

भारतातील सर्वात श्रीमंत महिला, 4,62,88,11,00,000.00  रुपये संपत्ती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं आहे. यासोबतच उद्योग क्षेत्रातही महिलांनी आज पुरुषांना स्पर्धात्मक आव्हान दिलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला आज भारताच्या सर्वात श्रीमंत महिलेबद्दल सांगणार आहोत.

भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचं नाव सावित्री जिंदल आहे. सावित्री जिंदल या ‘जिंदल ग्रुप’च्या मालकीन आहेत. जिंदल ग्रुप स्टील, पॉवर, सीमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहे. सावित्री जिंदल या दिवंगत ओम प्रकाश जिंदल यांच्या पत्नी आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योगपती सज्जन आणि नवीन जिंदल यांची आई आहे.

ओम प्रकाश जिंदल भारतातील एक नावाजलेले उद्योगपती आणि राजकीय नेते होते. 2005 मध्ये ओपी जिंदल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यानंतर जिंदल ग्रुपची कंपनी चार मुलांमध्ये वाटण्यात आली. या ग्रुपच्या सर्वात मोठ्या संपत्तीच्या देखेरेखीचं काम त्यांचा मुलगा सज्जन जिंदल करतो. सज्जनकडे जेएसडब्ल्यू स्टील आहे.

आता 68 वर्षाच्या सावित्री जिंदल यांनी राजकीय क्षेत्रातही काम केलं. सावित्री जिंदल या हरियाणामध्ये मंत्री होत्या.

सावित्री जिंदल यांची एकूण संपत्ती 6.5 बिलियन डॉलर आहे. भारतीय रुपयांत त्यांची संपत्ती 45 हजार 547  कोटी रुपये इतकी आहे. सावित्री जिंदल कुटुंब जगातील श्रीमंतांच्या यादीत 290 व्या स्थानावर आहेत. तर भारतातील श्रीमंतांच्या यादीत सावित्री जिंदल 14 व्या क्रमांकावर आहेत.

2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत हिसार मतदारसंघात सावित्री जिंदातल पराभूत झाल्या. भाजपच्या डॉ. कमल गुप्तांनी त्यांच्यावर 13 हजार 646 मतांनी विजय मिळवला. सावित्री जिंदल या आशियातील सर्वात श्रीमंत महिला असल्याचं  सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.