भारतातील टॉप पाच धबधबे! एकदा तरी नक्की भेट द्या

| Updated on: Jul 06, 2019 | 3:36 PM

आपल्याला महाराष्ट्रातील माळशेज घाट, भूशी डॅम, पांडवकडा, मार्लेश्वर, भिवपूरी हे सर्व धबधबे माहीत आहे. मात्र भारतात काही असे धबधबे आहेत, जे पाहिल्यावर तुम्हालाही या धबधब्यांना एकदा तरी भेट द्यावीशी वाटेल.

भारतातील टॉप पाच धबधबे! एकदा तरी नक्की भेट द्या
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक वर्षात पावसाळा आणि धबधबा हे एक अनोखं समीकरण बनलं आहे. पावसाळा सुरु झाला की, सर्वांना माळशेज घाटापासून ते लोणावळच्या भूशी डॅमची आठवण येते. दर विकेंडला मित्र मैत्रिणींचे ग्रुप विविध धबधब्यांवर जाऊन पावसाची मजा घेत असतात. आपल्याला महाराष्ट्रातील माळशेज घाट, भूशी डॅम, पांडवकडा, मार्लेश्वर, भिवपूरी हे सर्व धबधबे माहीत आहे. मात्र भारतात काही असे धबधबे आहेत, जे पाहिल्यावर तुम्हालाही या धबधब्यांना एकदा तरी भेट द्यावीशी वाटेल.

दुधसागर धबधबा, गोवा

मुसळधार पाऊस, आजूबाजूची हिरवळ, दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र फेसाळत वाहणारा धबधबा आणि त्यातून जाणारी रेल्वे…असे स्वप्नवत दृष्य तुम्हाला अनुभवायचे असेल, तर एकदा तरी गोव्यातील दुधसागर धबधब्याला भेट द्या. दुधसागर धबधबा हा मनडोवी नदीपासून तयार होतो. या धबधब्याची उंची जवळपास 1020 फूट आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधबा असून जगभरात या धबधब्याचे स्थान 227 वर आहे.

जोग धबधबा, कर्नाटक

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा अशी कर्नाटकातील जोग धबधब्याची ओळख आहे. या धबधब्याचे राजा, रोअरर, राणी आणि रॉकेट असे या धबधब्याचे चार प्रवाह आहे. हा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर स्थित असून तो दक्षिण आशियातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्यातील पाणी 250 मीटर उंच टेकडीवरुन खाली पडतानाचे दृश्य विंहगम असते.


चित्रकूट धबधबा, छत्तीसगड

छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात चित्रकूट नावाचा अप्रतिम सौंदर्याचा नैसर्गिक धबधबा आहे; ज्यास भारताचा नायगारा म्हणतात. हा धबधबा 29 मीटर उंच आहे.

वजहाचल धबधबा, केरळ

केरळच्या चालकुंडी नदीवर स्थित असलेल्या वजहाचल धबधबा चारही बाजूंनी झाडाझुडुपांनी वेढला आहे. हा धबधब्यातील पाणी फार वेगाने पडते. तसेच ज्या नदीतून हा धबधबा प्रवाहीत होतो, त्यात जवळपास 90 प्रकारचे मासे आढळतात.

तालकोना धबधबा, आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री वेंकटेश्वर नॅशनल पार्कमध्ये स्थित आहे. हा धबधबा तिरुमालाच्या पर्वतरांगामध्ये वसला आहे. याची उंची 270 फूट आहे.