AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार की नाही?

श्रेयस अय्यरच्या मागे दुखापतींचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकला होता. आता न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? असा प्रश्न समोर आला आहे.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार की नाही?
श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार की नाही?Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 25, 2025 | 5:38 PM
Share

श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीनंतर मैदानापासून दूर आहे. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीतही खेळत नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी किती काळ लागेल असा प्रश्न विचारला जात आहे. कारण न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी अजूनही संघ घोषित केलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर या मालिकेत खेळणार की नाही असा प्रश्न आहे. त्याच्या दुखापतीबाबत एक अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यर बंगळुरुला रवाना झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत आहे. 24 डिसेंबरला मुंबईत फलंदाजी केली आणि त्यानंतर बीसीसीआयच्या सेंट्रल ऑफ एक्सीलेंसमध्ये रवाना झाला आहे. पण मैदानात कधी परतेल हे सांगणं कठीण असल्याचं सांगितलं. पण श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीतून पुनरागमन करण्यास इच्छुक आहे.

25 ऑक्टोबरला सिडनी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर झेल घेताना दुखापतग्रस्त झाला होता. आता त्याला दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या मते, श्रेयस अय्यरला फलंदाजी करताना कोणतीही अडचण जाणवत नाही. त्यामुळे अय्यर बंगळुरुत कोर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चार ते पाच दिवस घालवण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्या मैदानात परतण्याची वेळ निश्चित केली जाईल. श्रेयस अय्यर जिममध्ये नियमित प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. पण पुढच्या चार ते सहा दिवसात त्याच्या फिटनेसबाबत आकलन केलं जाईल. कारण कोणताही खेळाडू फिट जरी असला तरी त्याला लगेच मैदानात उतरण्याची परवानगी दिली जात नाही.

भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिका

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. टी20 संघाची घोषणा आधीच केली आहे. मात्र वनडे संघाची घोषणा केलेली नाही. वनडे मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारीला केली जाण्याची शक्यता आहे. या संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कदाचित या मालिकेतून श्रेयस अय्यर मैदानात परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर थेट आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसेल.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी