VHT: विराट आणि रोहित शर्मा यांचा सामना टीव्हीवर पाहता येणार? पुढच्या सामन्यापूर्वी मोठी घोषणा
विजय हजारे ट्रॉफीत दिग्गज खेळाडू खेळत आहेत. त्यामुले चाहत्यांमध्ये त्यांना खेळताना पाहण्याचा उत्साह आहे. पण पहिला सामना घरी बसून पाहता आला नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच काय तर जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले होते.

देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धा अर्थात विजय हजारे ट्रॉफी 2025-26 सुरू आहे. या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यासारखे दिग्गज खेळाडू खेळत आहे. दोघांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे वनडे संघात स्थान कायम राहावं यासाठी त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळणं भाग आहे. पहिल्या सामन्यात दोघांनी शतक ठोकलं आणि फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. पण त्यांची ही खेळी अनेकांना पाहताच आली नाही. कारण या सामन्याचं थेट प्रसारण कुठेच केलं नव्हतं. त्यामुळे चाहत्यांनी बीसीसीआयवर उघड नाराजी व्यक्त केली. इतका पैसा बोर्डाकडे असून जर लाईव्ह सामना दाखवता येत नसेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. पण नाराजी व्यक्त करूनही या स्थितीत काही बदल होईल असं वाटत नाही. पुढचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.
देशांतर्गत इतर क्रिकेट स्पर्धांसारखंच विजय हजारे ट्रॉफीचे एखाद दुसरा सामना टीव्ही किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे लाईव्ह प्रसारित झालं होतं. पहिल्या फेरीत दिल्ली आणि मुंबई हा सामना याचा भाग नव्हता. त्यामुळे चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यामुळे पुढच्या सामन्यात बीसीसीआय आणि ब्रॉडकास्टर जियो स्टार स्पोर्ट्स प्रसारण करेलं वाटत होतं. पण क्रीडारसिकांच पुन्हा एकदा हिरमोड होणार हे स्पष्ट झालं आहे. याबाबतचा खुलासा खुद्द स्टार स्पोर्ट्सने केला आहे. एका युजर्सने एक्सवर स्टार स्पोर्ट्सला टॅग करत हा प्रश्न विचारला होता. विजय हजारे ट्रॉफीचे कोणता सामना लाईव्ह दाखवले जाणार आहेत. तेव्हा स्टार स्पोर्ट्सने उत्तर देत सांगितलं की, शुक्रवारी म्हणजेच 16 डिसेंबरला झारखंड विरुद्ध राजस्थान आणि आसाम विरुद्ध जम्मू काश्मीर हे सामने टीव्ही आणि हॉटस्टारवर दाखवले जातील.
Hi! You can watch the Vijay Hazare Trophy 2025–26 on FRI, 26th DEC, from 9 AM onwards. Jharkhand vs Rajasthan LIVE on JioHotstar & Star Sports Khel, and Assam vs J&K LIVE on JioHotstar.
— Star Sports (@StarSportsIndia) December 24, 2025
पुढच्या सामन्यात विराट आणि रोहित कोणाविरुद्ध खेळणार?
26 डिसेंबरला दिल्लीचा सामना गुजरातशी आणि मुंबईचा सामना उत्तराखंडशी होणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळताना पाहण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे मैदान प्रेक्षकांनी भरलं होतं. दुसरीकडे, बीसीसीआयने बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे दिल्लीच्या सामना पाहण्यास प्रेक्षकांना बंदी घातली होती. आताही तसंच असणार आहे. पण बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्स पुढील 24 तासात काही बदल करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
