61 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत उलटली, चौघांचा मृत्यू

| Updated on: Sep 15, 2019 | 4:57 PM

आंध्र प्रदेशच्या गोदावरी नदीत बोट (Tourist boat capsizes in Godavari river) उलटली आहे. ही प्रवासी बोट असून यात 61 लोक होते.

61 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत उलटली, चौघांचा मृत्यू
Follow us on

हैद्राबाद : आंध्र प्रदेशच्या गोदावरी नदीत बोट (Tourist boat capsizes in Godavari river) उलटली आहे. ही प्रवासी बोट असून यात 61 लोक होते. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवीपाटन (Tourist boat capsizes) या परिसरात ही दुर्घटना (Andhra Pradesh Tourist boat capsizes) घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान सध्या या ठिकाणी एनडीआरफच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (15 सप्टेंबर) दुपारी 3.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ही बोट आंध्रप्रदेश पर्यटन विकास निगमद्वारे (Andhra Pradesh Tourist boat capsizes) चालवण्यात येत होती. यात जवळपास 61 प्रवाशांचा समावेश आहे. त्यात काही बोट चालकाचाही समावेश आहे. ही बोट कच्चुलुरु या ठिकाणी उलटली.


या दुर्घटनेवेळी इतरीही बोटी नौकाविहार करत होत्या. दुर्घटना झाल्यानंतर त्या बोटीतील काही जणांनी नदीत उडी मारुन प्रवाशांना वाचवण्यास मदत केली.

या दुर्घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला असून 23 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र अद्याप काही प्रवाशी बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरु आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनेत वाचलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, या बोटीत जवळपास 61 पेक्षा अधिक लोक बसले होते. ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणे झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.