नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा

| Updated on: Jan 02, 2020 | 7:35 PM

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज (2 जानेवारी 2020) 2 हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे (PM Kisan Sanman Nidhi Yojana).

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा
Follow us on

नवी दिल्ली : नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज (2 जानेवारी 2020) 2 हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे (PM Kisan Sanman Nidhi Yojana). स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना याबाबत माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मी बोलतो आहे या कार्यक्रमातच एकाच वेळी देशातील 6 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 12 हजार कोटी रुपये जमा होतील. देशात असाही काळ होता जेव्हा गरिबांना 1 रुपये पाठवल्यास त्यांच्यापर्यंत केवळ 15 पैसे पोहचायचे. उरलेले 85 पैसे दलालच खात होते. मात्र, आज जितके पैसे पाठवले जातात, ते सर्व थेट गरिबांच्या बँक खात्यात जमा होतात.” नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील अन्नदात्याचं, आपल्या शेतकरी बंधू भगिनींची भेट होणं ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे, असंही मोदींनी म्हटलं.

यावेळी मोदींनी 130 कोटी देशवासीयांच्यावतीने देशातील प्रत्येक शेतकऱ्याला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशासाठी अन्नधान्याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभारही मानले.

मोदींनी मागील काळात सरकारने आणलेल्या योजनांचाही उल्लेख केला. अनेक दशकांपासून प्रलंबित सिंचन योजना, पीक विमा योजनांच्या नियमातील बदल, माती आरोग्य कार्ड, युरियाला 100 टक्के निंबोळीचं कोटिंग अशा अनेक गोष्टींमध्ये आमच्या सरकारने शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं, असंही मोदींनी म्हटलं.

दरम्यान, शेतकरी सन्मान योजने अंतर्गत आत्तापर्यंत दोन हप्ते जमा झालेले आहेत. हा यातील तिसहा हप्ता असेल. मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी 2018 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहित लागण्याआधीच या योजनेनुसार पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या योजनेनुसार 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.