साताऱ्याचे शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना मातृशोक

| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

नवी मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई यांचे निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांनी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना […]

साताऱ्याचे शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना मातृशोक
Follow us on

नवी मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई यांचे निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांनी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.

अण्णासाहेब पाटील यांचे कार्य पुढे नेण्यासाठी वत्सलाताई नेहमीच पुढे येऊन कार्यात सहभागी होत असत. वत्सलाताई यांच्याबद्दल माथाडी कामगारांमध्ये एक वेगळीच आस्था होती. निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे पार्थिव शुक्रवार 26 एप्रिलला सकाळी 9 वाजता माथाडी भवन, तुर्भे, नवी मुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.