Corona Vaccine | कोरोना लस संशोधनात ‘हा’ देश सर्वात पुढे, सर्वसामान्यांना लस कधी मिळणार?

| Updated on: Oct 27, 2020 | 2:15 PM

कोरोना विषाणूवरील लस कधी सर्वसामान्यांना मिळणार याकडे संपूर्ण जगाच लक्ष लागलं आहे. मोफत कोरोना लस हा राजकारणाचा विषय झाला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी मोफत कोरोना लस देण्याचं जाहीर केलय. भारतात बिहारमधील निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन देण्यात आलेय. मात्र, कोरोना लसींच्या चाचण्या कधी येणार या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. जगात 144 लसींवर संशोधन सुुरू आहे. ( What is status of corona vaccine, which country leading in corona vaccine test )

Corona Vaccine | कोरोना लस संशोधनात हा देश सर्वात पुढे, सर्वसामान्यांना लस कधी मिळणार?
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गामुळं संपूर्ण जगात 10 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगातील सर्व नागरिक कोरोना लसीची वाट पाहात आहे. कोरोनावरील लसींचं संशोधन विविध देशांमध्ये सुरु आहे. मानवी चाचणी दरम्यान काहीवेळा लसींचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन कंपन्यांना त्याच्या कोरोना लसींच्या चाचण्या थांबवाव्या लागल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 154 कोरोना लसीवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. यापैकी 44 लसी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. ( What is status of corona vaccine, which country leading in corona vaccine test )

चीनच्या तीन कंपन्या सर्वात पुढे

कोरोना लसीच्या शर्यतीत सध्या चीन सर्वात पुढे आहे. चीनमधील तीन कंपन्या सिनोवाक(चीन), सिनोफार्म (वुहान) सिनोफार्म (बीजिंग) या कंपन्यांच्या लसींच्या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे. यामधील दोन कंपन्यांनी लस देशातील आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना द्यायला सुरूवात केली आहे. या कंपन्यांच्या लसीचा दुष्परिणाम समोर आलेला नाही.

चीननंतर कोरोना ब्रिटनमधील ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका, मॉडर्ना(अमेरिका),कैनिसिनो बायोलॉजिकल (चीन), जॉनसन अँड जॉनसन(अमेरिका) आणि नोवावॅक्सिन या कंपन्यांच्या लसीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

सर्वप्रथम लस बनवल्याचा रशियाचा दावा

कोरोना लस सर्वात अगोदर बनवण्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या दाव्याचे अमेरिका, चीन आणि भारतासह इतर देशांनी समर्थन केलेले नाही. स्फुटनिक-व्ही ही रशियाची लस सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्याचा दावा रशियाने केले आहे. काही लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये लसीचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

चाचण्या दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या लसी

ज्हाफी (चीन), इनोवायो फार्मास्यूटिकल कंपनी (अमेरिका), मर्क अँड कंपनी (अमेरिका), सनोफी (फ्रान्स) ग्लैक्सोमिथक्लाइन (ब्रिटन) या कोरोना लसींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

चौथ्या चाचणीनंतर लस सर्वसामान्यांसाठी

क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यानंतर आपत्कालीन परवानगी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना लस दिली जाईल त्यांनंतर त्याचा डाटा तयार केला जाईल. यानंतर कोरोना लस निर्मिती कंपन्यांना अंतिम परवानगी घ्यावी लागेल. यासर्व प्रक्रियेनंतर कोरोन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या :

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार शिगेला, ट्रम्प-बायडेन यांचे कोरोना लस मोफत देण्याचे आश्वासन

( What is status of corona vaccine, which country leading in corona vaccine test )