लॉकडाऊनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीशी वादानंतर विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

जत तालुक्यातील एका विवाहितेने माहेरला जाण्याच्या कारणावरुन दोन चिमुरड्यासह आत्महत्या (Women suicide with children sangli) केली.

लॉकडाऊनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीशी वादानंतर विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
| Edited By: | Updated on: Apr 17, 2020 | 8:11 AM

सांगली : जत तालुक्यातील एका विवाहितेने लॉकडाऊनमध्ये माहेरला जाण्याच्या कारणावरुन दोन चिमुरड्यांसह आत्महत्या (Women suicide with children sangli) केली. ही धक्कादायक घटना सांगलीतील जत तालुक्यातील नवाळवाडी येथे घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पाच आणि तीन वर्षांची दोन मुलं (Women suicide with children sangli) आहेत.

बेबीजा इब्राहिम नदाफ हिने आपल्या पाच वर्षीय जोया इब्राहिम नदाफ आणि तीन वर्षीय सलमान इब्राहिम नदाफ या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. बेबीजान नदाफ यांचे माहेर कर्नाटकातील विजापूर येथे आहे. बेबीजान यांना विजापूरला माहेरी जायचे होते. त्यांचे पती इब्राहिम नदाफ यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर जाऊयात असे सांगितले. याच किरकोळ कारणावरून पती आणि पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.

वाद वाढल्याने बेबीजान यांनी पती कामानिमित्त शेतामध्ये गेल्यावर रागात दोन चिमुरड्यांना घेऊन घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आत्महत्येनंतर तातडीने सांगली पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन केले. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.