Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हायचंय? फक्त 10 मिनिटांत करा मेकअप, मिळवा सुंदर लूक

10 Minutes Instant Makeup: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील कामे, पूजेची तयारी याची बरीच धावपळ असते. त्यात मेकअप करायला निवांत वेळ नसतो. अशा वेळी या इंस्टंट टिप्सने तुम्ही १० मिनीटात मेकअप करु शकता.

Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हायचंय? फक्त 10 मिनिटांत करा मेकअप, मिळवा सुंदर लूक
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 6:59 PM

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांची सकाळपासूनच लगबग सुरू असते. घराची साफसफाई, सजावट, फराळाची तयारी आणि पूजेची धावपळ यात स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी मेकअपसाठी तासन् तास घालवण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही अवघ्या १० मिनिटांत सुंदर आणि आकर्षक लूक मिळवू शकता. विशेष म्हणजे, हा मेकअप नॅचरल दिसतो आणि तुमचा वेळही वाचवतो. मात्र, मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर लावा.

सीसी क्रीम लावा
सीसी क्रीम बीबी क्रीमपेक्षा जास्त अॅडव्हान्स आहे. त्याचा जाड थर तुमच्या चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सीसी क्रीम लावा. तुम्हाला खूप कमी प्रमाणात सीसी क्रीम लावावे लागेल.

Loading...

काजळ लावा
काजळ लावल्याने तुमचे डोळे चांगले ठळक होतील. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही काजळ वापरू शकता. शक्यतो काजळ स्मज फ्री वापरा.

लिपस्टिक लावा
डल चेहरा देखील ब्राइट करण्यात लिपस्टिकचा चांगला वाटा आहे. अशा स्थितीत सणासुदीला तुम्ही ब्राइट किंवा डार्क रंगाची लिपस्टिक लावू शकता. लिपस्टिक लावल्याने तुमचा मेकअप पूर्ण होईल.

ब्लश लावा
जर तुमच्याकडे ब्लशर नसेल तर तुम्हाला यासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही लिपस्टिकमधून ब्लशर बनवू शकता. तुमच्या गालावर थोड्या प्रमाणात लिपस्टिक लावा आणि ते चांगले ब्लेंड करा. लक्षात ठेवा की तुम्हाला जास्त लिपस्टिक वापरण्याची गरज नाही.

मस्कारा
मस्कारा देखील तुम्ही इंस्टंट लावू शकता. यामुळे तुमच्या पापण्या जाड दिसतील. शेवटी मस्करा लावा. यामुळे तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. याने तुमचा मेकअप पूर्ण होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us